समंथाने नाकारली Pushpa 2 ची मोठी ऑफर? कोट्यवधींच्या मानधनाला दिला नकार, अल्लू अर्जुन नाराज?

'पुष्पा 2'मध्ये आयटम साँग करण्याची ऑफर तिला देण्यात आली होती. मात्र समंथाने या गाण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. समंथाचा पुष्पा 1 मधील 'ऊ अंटावा' हे गाणं तुफान गाजलं होतं. आजही पार्ट्यांमध्ये या गाण्याची क्रेझ पहायला मिळते.

समंथाने नाकारली Pushpa 2 ची मोठी ऑफर? कोट्यवधींच्या मानधनाला दिला नकार, अल्लू अर्जुन नाराज?
SamanthaImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 2:07 PM

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथाच्या प्रकृतीविषयी जोरदार चर्चा होती. आता तिच्या आणखी एका प्रोजेक्टविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार समंथाने आगामी ‘पुष्पा 2’मध्ये परफॉर्म करण्याची ऑफर नाकारल्याचं कळतंय. ‘पुष्पा 2’मध्ये आयटम साँग करण्याची ऑफर तिला देण्यात आली होती. मात्र समंथाने या गाण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. समंथाचा पुष्पा 1 मधील ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं होतं. आजही पार्ट्यांमध्ये या गाण्याची क्रेझ पहायला मिळते.

ऊ अंटावा हे गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनसोबत समंथाचा डान्स प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे पुष्पा 2 मध्येही तिचं एक गाणं असेल अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. मात्र तिने या गाण्याची ऑफर नाकारल्याने चाहते नाराज झाले आहेत. याप्रकरणी अद्याप समंथाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात समंथाने तिच्या करिअरमधील पहिला आयटम साँग केला होता. जवळपास 3 मिनिटांच्या या गाण्यासाठी तिने तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात होतं. या गाण्यात समंथाने आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. अजूनही सोशल मीडियावर ‘ऊ अंटावा’ची क्रेझ पहायला मिळते. पार्ट्यांमध्येही हे गाणं वाजलं की त्याच्या हुकस्टेपवर सर्वांचे पाय थिरकतात. ‘पुष्पा’मधील हा आयटम साँग आतापर्यंत तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रत्येक भाषेतील या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला.

हे सुद्धा वाचा

‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमधील समंथाचा बोल्ड लूक, तिचा डान्स आणि त्यावरील मादक अदा पाहून चाहते अवाक् झाले होते. कारण समंथा अशा अंदाजात पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली. विशेष म्हणजे तिने या गाण्याला सुरुवातीला नकार दिला होता. अल्लू अर्जुनने समंथाला या गाण्याची ऑफर दिली होती. बराच वेळ विचार केल्यानंतर तिने नकार कळवला. मात्र त्यानंतरही अल्लू अर्जुनने तिला समजावलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवत समंथाने ऑफर स्विकारली. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली होती.

पुष्पा 2 ची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनच्या 41 व्या वाढदिवशी दिग्दर्शक सुकुमार त्याच्या चाहत्यांसाठी खास भेट देणार असल्याचंही कळतंय. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी पुष्पा 2 ची छोटीशी झलक म्हणजेच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. अल्लू अर्जुनचा वाढदिवस येत्या 8 एप्रिल रोजी आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.