Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाने विराट कोहलीला केलं होतं डेट? बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करतेय. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने विजयबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. हे दोघं गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Tamannaah Bhatia | तमन्ना भाटियाने विराट कोहलीला केलं होतं डेट? बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सत्य
तमन्ना भाटिया, विराट कोहलीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 3:10 PM

मुंबई : तमिळ आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता विजय वर्माबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर तमन्नाचे ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि ‘जी करदा’ हे दोन वेब सीरिज त्यातील इंटिमेट सीन्समुळे चर्चेचा विषय ठरले. मात्र फार क्वचित लोकांना हे माहीत असेल की काही वर्षांपूर्वी तमन्नाचं नाव एका प्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडण्यात आलं होतं. तमन्ना आणि विराट कोहली यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी दोघांनीही त्यावर मौन बाळगलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर तमन्नाने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

2012 मध्ये तमन्ना आणि विराट कोहली हे एका जाहिरातीसाठी एकत्र आले. एका मोबाइल फोनच्या ब्रँडसाठी दोघांनी एकत्र जाहिरात केली होती. त्यावेळी विराटसुद्धा क्रिकेटविश्वात जलदगतीने नाव कमावत होता. तर तमन्ना दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री ठरली होती. जाहिरातीत एकत्र काम केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र दोघांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर 2017 मध्ये विराटने अनुष्का शर्माशी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने अफेअरच्या चर्चांमागील सत्य सांगितलं. तमन्ना म्हणाली की “प्रमोशनदरम्यान मी त्याच्याशी फक्त चार शब्द बोलले आणि त्यानंतर आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही किंवा भेटलो नाही.” मात्र विराटसोबत जाहिरातीत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता असं तिने सांगितलं. यावेळी तमन्नाने त्याच्या विनोदी स्वभावाचाही विशेष उल्लेख केला. विराटसोबतच्या अफेअरच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

‘बाहुबली’ फेम तमन्ना भाटिया सध्या अभिनेता विजय वर्माला डेट करतेय. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिने विजयबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. हे दोघं गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आगामी ‘लस्ट स्टोरीज 2’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटात पहिल्यांदाच तमन्ना आणि विजय एकत्र काम करताना दिसणार आहेत.

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. किसिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.