कपूर घराण्यातील मुलाचं लग्न; रोका सेरेमनीमध्ये पोहोचली एक्स गर्लफ्रेंड, काय आहे सत्य?

कपूर कुटुंबातील आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांचा रोका नुकताच पार पडला. आदर याआधी अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. ब्रेकअपनंतर त्याने ताराचीच मैत्रीण आलेखाला प्रपोज केलं होतं. आता या दोघांच्या रोका कार्यक्रमात आदरची एक्स गर्लफ्रेंड तारासुद्धा उपस्थित होती अशी चर्चा आहे.

कपूर घराण्यातील मुलाचं लग्न; रोका सेरेमनीमध्ये पोहोचली एक्स गर्लफ्रेंड, काय आहे सत्य?
Aadar Jain, Alekha Advani and Tara Sutaria Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 10:39 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत कपूर घराण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात काहीही घडलं तरी त्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. राज कपूर यांचा नातू, रीमा जैन यांचा मुलगा आणि रणबीर, करीना, करिश्मा यांचा चुलत भाऊ आदर जैन त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिला. त्याचा शनिवारी गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीसोबत रोका (साखरपुडा) पार पडला. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून आदर हा अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. कपूर कुटुंबातील विविध कार्यक्रमांमध्येही ताराने आदरसोबत हजेरी लावली होती. मात्र तिच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर आदर हा तिचीच मैत्रीण आलेखा अडवाणीला डेट करू लागला. आलेखा ही आदर आणि तारा या दोघांची मैत्रीण होती. आता एक्स बॉयफ्रेंड आणि मैत्रिणीच्या साखरपुड्याला ताराने सजून-धजून हजेरी लावल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे.

शनिवारी एकीकडे सोशल मीडियावर आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांच्या रोकाला उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. तर दुसरीकडे ताराचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. यामध्ये तिने सोनेरी रंगाची साडी नेसली असून त्यावर साजशृंगार केला आहे. ताराचा हा लूक पाहून ती एक्स बॉयफ्रेंड आदरच्या रोकाला उपस्थित राहण्यासाठी गेली की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. मात्र या व्हिडीओचं सत्य वेगळंच आहे. तारा तिच्या दुसऱ्या मैत्रिणीच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात हे लग्न होतं.

हे सुद्धा वाचा

तारा आणि आदर यांनी 2020 मध्ये त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. त्याच्या आधीपासूनच दोघं एकमेकांना डेट करत होते. ताराने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर दुसरीकडे आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात. आलेखाने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी फॉलो करतात.

आदर आणि आलेखाचं नातं सर्वांसमोर आल्यानंतर रेडिटवर एक जुना फोटो चर्चेत आला होता. हा फोटो आलेखा, आदर आणि तारा या तिघांचा होता. आलेखाने तारा सुतारिया आणि आदर जैनला या फोटोमध्ये टॅग केलं होतं. तिघांचा हा सेल्फी होता आणि त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, ‘नेहमीच तिसरी व्यक्ती’. यावरून नेटकऱ्यांनी आलेखा आणि आदरला खूप ट्रोल केलं होतं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.