Urmila Adinath Kothare: आदिनाथ-उर्मिला कोठारेत नेमकं काय बिनसलं? ‘या’ कारणांमुळे होतेय चर्चा

उर्मिला-आदिनाथ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आणि अगदी दृष्ट लागावी अशीच आहे. 'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.

Urmila Adinath Kothare: आदिनाथ-उर्मिला कोठारेत नेमकं काय बिनसलं? 'या' कारणांमुळे होतेय चर्चा
Urmila Adinath KothareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 5:37 PM

अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare).. ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अगदी दृष्ट लागावी अशीच आहे. अनेकदा या दोघांची लव्हस्टोरी चर्चेत आली. सोशल मीडियावर या जोडीचा मोठा चाहतावर्ग असून आदिनाथ किंवा उर्मिलाने एकमेकांसोबत फोटो पोस्ट केले की त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो. महेश कोठारेंनी त्यांच्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावलं होतं. तेव्हा आदिनाथ तिला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आदिनाथ आणि उर्मिला यांना जिजा ही मुलगी आहे. जिजाचे फोटो आणि व्हिडीओ दोघंही सोशल मीडियावर शेअर करत असतात. आदिनाथने शेअर केलेल्या जिजाच्या रंजक कथा नेटकऱ्यांना खूप आवडतात. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’ असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.

का होतेय चर्चा?

गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ त्याच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. मात्र त्याच्या या संपूर्ण प्रवासात किंवा चित्रपटाच्या प्रिमिअरला उर्मिला कुठेच पहायला मिळाली नाही. उर्मिलाने सोशल मीडियावरही त्याच्यासाठी किंवा त्याच्या चित्रपटासाठी पोस्ट लिहिली नाही. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांमागे फक्त हेच कारण नाही. तर नुकतंच उर्मिलाने तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त आदिनाथनेही तिच्यासाठी कोणतीही पोस्ट लिहिली नाही. किंवा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ समोर आले नाही.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

या चर्चांदरम्यान आणखी एक प्रश्न समोर आला आहे, तो म्हणजे उर्मिलाने आदिनाथला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं की काय? उर्मिला फॉलो करत असलेल्यांमध्ये आदिनाथचं नाव मात्र नाही. मात्र आदिनाथ अजूनही तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतेय. त्यामुळे उर्मिलाने आदिनाथला अनफॉलो का केलं असेल असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप या सर्व चर्चांवर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.