आयरा – नुपूर यांच्यात किती आहे वयाचं अंतर? आमिर खानची लेक इतकी लहान
Aamir Khan daughter : आयरा - नुपूर यांच्या किती आहे वयाचं अंतर? अभिनेत्याची लेक फक्त 26 वर्षांची, तिचा पती मात्र…, आयरा खान अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते. आयरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.
अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते. आयरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आयरा सध्या पती नुपूर शिखरे याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद लूटताना दिसत आहे. 3 जानेवारी रोजी आयरा खान बिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरिज केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मोठ्या थाटात आमिर खान याने लेकीचं लग्न केलं.
आयरा – नुपूर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर आयरा – नुपूर यांच्या वयाची देखील चर्चा रंगलेली असते. आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे. आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे.
नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. आमिर खान याची लेक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयरा कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
आयरा खान हिच्या सासूबाईंबद्दल सांगायचं झाल तर, त्या कथक नृत्यांगना आहे. आयरा खान हिच्या सासूबाईंनी अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या मुलींना कथकचं प्रशिक्षण दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्या कथक नृत्याचे देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात.
आमिर खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘सितारे जमीन पर’ सिनेमात अभिनेता दिसणार आहे. याआधी अभिनेत्याने दुसरी पत्नी किरण राव हिच्यासोबत ‘लापता लेडिज’ सिनेमात एकत्र काय केलं होतं. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी आमिर खान याच्यावर होती. ‘लापता लेडिज’ सिनेमा चाहते आणि सेलिब्रिटींना देखील प्रचंड आवडला.
आता अभिनेता ‘सितारे जमीन पर’ सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा ख्रिसमसच्या अखेरीस मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.