भारतातच नाही तर परदेशात देखील सानिया मिर्झाची गडगंज संपत्ती, आकडा थक्क करणारा

Sania Mirza : घटस्फोटामुळे सानिया मिर्झा तुफान चर्चेत, तिच्या संपत्तीचा आकडा मात्र फार मोठा, सानिया मिर्झा की शोएब मलिक कोण आहे अधिक संपत्ती? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया मिर्झा आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

भारतातच नाही तर परदेशात देखील सानिया मिर्झाची गडगंज संपत्ती, आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 10:47 AM

Sania Mirza : गेल्या काही दिवसांपासून भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक यांनी अनेक वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला आहे. सानिया हिने टिनेस खेळत अनेक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. सानिया तिच्या मुलासोबत रॉयल आयुष्य जगते. सानिया मिर्झा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, सानिया हिची संपत्ती फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील आहे.

सानिया हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, सानिया कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. सानिया मिर्झा हिच्या आतापर्यंतच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, सानिया हिच्याकडे जवळपास 26 मिलियन डॉलर म्हणजे 260 कोटी रुपयांची संपत्ती आहे. शोएब याच्यापेक्षा सानिया हिच्या संपत्तीचा आकडा फार मोठा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा हिचं हैदराबाद आणि दुबई याठिकाणी स्वतःचा आलिशान बंगला आहे. सानिया हिच्या दोन्ही बंगल्यांची किंमत तब्बल कोट्यवधी रुपये आहे. सानिया हिचं हैदराबाद येथे असलेल्या बंगल्याची किंमत 13 कोटी रुपये आहे. सानिया फक्त टेनिस नाही तर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.

सानिया अनेक प्रसिद्ध ब्रॉन्ड्ससोबत काम करते. ज्यामुळे सानिया कोट्यवधींची कमाई करते. एवढंच नाही तर सानियाने एक स्पोर्ट्स अकादमीही सुरू केली आहे, ज्यामध्ये ती सर्व क्रीडा विद्यार्थ्यांना खेळ शिकवते. शिवाय सानिया हिला ब्रँडेड कपडे आणि सुट्टीच्या काळात कुटुंबासह परदेशात फिरायला प्रचंड आवडतं.

सानिया हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, 2023 मध्ये सानिया हिची संपत्ती 26 मिलियन डॉलर म्हणजे 210 कोटी रुपये होती. सानिया एका जाहिरातीसाठी तब्बल 60 ते 75 लाख रुपये मानधन घेते. तर शोएब याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, शोएब याची नेटवर्थ 25 मिलियन डॉलर म्हणजे 207 कोटी रुपये आहेत.

सानिया मिर्झा हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. सानिया हिने स्पोर्ट क्षेत्रात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. सध्या सानिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सानिया हिने 2010 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत लग्न केलं. लग्नानंतर सानिया हिने मुलाला जन्म दिला. पण सानिया आणि शोएब यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबई याठिकाणी राहते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.