बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची का झालीये अशी अवस्था? ओळखणं देखील कठीण

चाहत्यांना फिटनेस गोल्स देणाऱ्या अभिनेत्याची का झालीये अशी अवस्था? अचानक 30 किलो वजन का कमी झालं? चाहत्यांनी व्यक्त केली चिंता... सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा... सोशल मीडियावर अभिनेत्याचा फोटो तुफान व्हायरल... त्याला आता ओळखणं देखील कठीण...

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची का झालीये अशी अवस्था? ओळखणं देखील कठीण
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 9:30 AM

मुंबई | 19 मार्च 2024 : चेहऱ्यावरचं कमी झालेलं तेज, सडपातळ शरीर… कधीकाळी चाहत्यांना फिटनेस गोल्स देणाऱ्या अभिनेत्याची अवस्था अशी का झाली आहे… असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असले. सर्वात अधी तर, फोटोत दिसणार अभिनेता कोण आहे… असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहिला असेल. अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाहीतर, नेटकरी अभिनेत्याच्या फोटोवर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

फोटोमध्ये दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाहीतर, अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आहे. खुद्द रणदीप याने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे. रणदीप सध्या आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमामुळे चर्चेंत आहे. सिनेमात अभिनेता वीर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने तब्बल 30 किलो वजन कमी केलं आहे. हुबेहूब वीर सावरकर यांच्यासारखं शरीर मिळवण्यासाठी अभिनेत्याने कित्येक तास जीममध्ये घालवले आहेत. अभिनेत्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्वतःचा फोटो पोस्ट करत रणदीप म्हणाला, ‘काळा पाणी… ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील कलाकार देखील सिनेमाच्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाबद्दल काय म्हणाले वीर सावरकरांचे नातू?

वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सिनेमावर प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘रणदीप हुड्डा याच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.’

‘सिनेमा एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. मला आशा आहे की त्यांच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी सिनेमे बनतील.’ असं देखील वीर सावरकर यांचं नाती रणजीत सावरकर म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.