कतरिना कैफ हिला कसं पटवलंस? विकी कौशल याने दिलं सडेतोड उत्तर
katrina kaif - vicky kaushal | कशी झाली कतरिना कैफ - विकी कौशल यांच्या 'लव्हस्टोरी'ची सुरुवात, अभिनेत्याने कसं पटवलं कतरिनाला? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी - कतरिना यांच्या नात्याची चर्चा... चाहत्यांना कायम देत असतात कपल गोल्स...
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडच्या पॉवर कपल्स पैकी एक आहेत. विकी – कतरिना यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.. सांगायंच झालं तर, फार कमी लोकांना विकी – कतरिना यांची लव्हस्टोरी माहिती आहे. अनेक जण दोघांना त्यांच्या ‘लव्हस्टोरी’बद्दल विचारताना दिसतात. पण एकदा अभिनेत्री नेहा धुपिया हिने अभिनेत्याला त्याच्या आणि कतरिना हिच्या ‘लव्हस्टोरी’ बद्दल विचारलं.
नेहा धुपिया हिने एका मुलाखतीत विकी याला विचारलं, ‘बायकोला कसं पटवलंस ते आधी सांग?’ प्रश्नाचं हसत उत्तर देत विकी म्हणतो, ‘आमची लव्हस्टोरी देखील सामान्य आहे… दोघांची ओळख झाली… आम्हाला एकमेकांचा सहवास आवडला… त्यानंतर एकमेकांवर प्रेम झालं. दोघांना देखील जास्त काही करयाची गरज भासली नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला…
सध्या सर्वत्र विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे, दोघे देखील बॉलिवूडचे बडे स्टार आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कतरिना कैफ – विकी कौशल चाहत्यांना देतात कपल गोल्स, दोघांचे खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. कतरिना सतत पती विकी याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत कतरिना हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. लग्नाआधी कतरिना हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर यांना देखील अभिनेत्रीने डेट केलं… पण दोघांसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही…
अखेर विकी आणि कतरिना यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. मोठ्या शाही थाटात दोघांनी लग्न केलं. सोशल मीडियावर देखील दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही व्हायरल होत असतात. कतरिना कायम पती विकी याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. विकी – कतरिना दोघे कुटुंबासोबत देखील एकत्र वेळ व्यतीत करताना दिसतात.