शेरा नाही ‘हे’ आहे सलमान खान याच्या बॉडीगार्डचं खरं नाव, जाणून व्हाल थक्क

Salman Khan Bodyguard | कायम सलमान खानसोबत सावली सारख्या असणाऱ्या बॉडीगार्डचं नाव शेरा नाही तर काय? भाईजानच्या बॉडीगार्डचं खरं नाव जाणून व्हाल थक्क, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान सतत त्याच्यावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेत आला आहे.

शेरा नाही 'हे' आहे सलमान खान याच्या बॉडीगार्डचं खरं नाव, जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 2:37 PM

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे नाही तर, त्याच्यावर सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे चर्चेत आला आहे. भाईजानच्या कठीण परिस्थितीत बॉडीगार्ड शेरा कायम सलमान सोबत सावली सारखा उभा असतो. शेरा फक्त सलमान खान याचा बॉडीगार्डनसून खान कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य देखील आहे.

सांगायचं झालं तर, 1995 पासून सलमान खान याच्या सुरक्षेची जबाबदारी शेरा याच्या खांद्यावर आहे. शेरा याच्या शिवाय सलमान खान घरातून बाहेर पाऊल देखील ठेवत नाही. सलमान खान याच्या बॉडीगार्डला आज प्रत्येक जण शेरा म्हणून ओळखतात. पण शेराचं खरं नाव गुरमीत सिंग जॉली असं आहे. रिपोर्टनुसार, सलमान खान याचं संरक्षण करण्याचे शेरा महिन्याला 15 लाख रुपये मानधन घेतो.

शेरा याची आहे स्वतः आहे एजेंसी

शेरा याची स्वतःची एजेंसी देखील आहे. एजेंसी अंतर्गत शेरा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना सुरक्षा प्रधान करतो. शेरा याच्या कंपनीचं नाव ‘टायगल सिक्योरिटी सर्विसेज’ असं आहे. गेल्या 15 पेक्षा जास्त वर्षांपासून शेरा सलमान खान याची सावली म्हणून जगत आहे… सध्या सर्वत्र शेरा याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सलमान खान याच्याबद्दल काय म्हणाला होता सलमान खान?

एकदा शेरा म्हणाला होता, ‘सर्वांना माहिती आहे मी गेल्या 15 वर्षांपासून भाईसोबत राहत आहे. आता अनेक माध्यमांच्या व्यक्ती देखील माझे मित्र झाले आहेत. जेव्हा गोळी अंगावर घ्यायची वेळ येईल तेव्हा तुझा बॉडीगार्ड तुझ्यासमोर उभा राहिल.. पण खरं सांगायचं झालं तर भाई काहीही करु शकतो. भाई त्याच्या चाहत्यांसाठी काहीही करु शकतो आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा एक नाही दहा, पंधरा गोळ्या अंगावर घेण्यासाठी मी तयार असेल…’ असं देखील शेरा म्हणाला.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर दोन जणांनी गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी देखील सलमान खान याला जीवेमारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमकीनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांनी वाढ केली. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला Y + दर्जाची सुरक्षा दिली आहे. सध्या सलमान खान तुफान चर्चेत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.