Jawan | शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमातील रॅप तुम्हाला कळला का? काय बोलत आहे राजा कुमारी?
शाहरुख खान याच्या 'जवान' सिनेमाच्या प्रिव्ह्यूसोबतच रॅपची देखील चर्चा... रॅपमध्ये राजा कुमारी नक्की काय म्हणतेय तुम्हाला कळलं का?
मुंबई | अभिनेता शाहरुख खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची येणार आहे. किंग खान याच्या आगामी सिनेमाचा प्रिव्ह्यू प्रदर्शिद झाला आहे. सिनेमाचा प्रिव्ह्यू चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. प्रिव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या मनातील सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. ‘पठाण’ सिनेमाप्रमाणेच ‘जवान’ सिनेमात देखील तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेत्री नयनतारा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रिव्ह्यूमधील अभिनेत्रींच्या दमदार भूमिकेची एक झलक पाहायला मिळाली आहे. शिवाय प्रिव्ह्यूमध्ये एक रॅप आहे. त्या रॅपची देखील तुफान चर्चा रंगत आहे.
‘जवान’ सिनेमाला तामिळ सिमेविश्वातील प्रसिद्ध म्यूझिक दिग्दर्शक अनिरुद्ध रवीचंद्र यांनी म्यूझिक दिलं आहे. जवान सिनेमाच्या माध्यमातून अनिरुद्ध रवीचंद्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. पण सिनेमाच्या प्रिव्ह्यूमध्ये जे रॅप वाजत आहे, ते प्रसिद्ध रॅपर राजा कुमारी हिने लिहिलं आणि गायलं आहे.
प्रसिद्ध रॅपर राजा कुमारी हिने गायलेलं रॅप चाहत्यांना प्रचंड आवडलं आहे. तर राजा कुमारी हिने गायलेल्या रॅपची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. तर रॅपचे लिरिक्त जाणून घ्या…
Running with the King Khan bullets rain down like its thunder ready or not she got the glock she’ll put you under you know we game time on the front line till its over deep in the trenches for ya like a soldier
अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ सिनेमानंतर किंग खान याचा ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोशल मीडियावर देखील ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. शाहरुख खान देखील आक्स एसआरकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर देखील शाहरुख याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
आता ‘जवान’ सिनेमातून किंग खान प्रेक्षकांचं किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जवान सिनेमात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.