शरद पवारांकडे निर्मात्यांनी मांडली भूमिका, किरण माने प्रकरणाला वेगळे वळण
मुलगी झाली हो च्या निर्मात्यांनी किरण माने मला अपशब्द वापरले, ते सतत टाँट मारायचे, तसेच माझ्यामुळे मालिका चालते असं वारंवार म्हणायचे, त्यांची वर्तणूक चांगली नव्हती अशा पध्दतीचे गंभीर आरोप निर्मात्यांनी शरद पवार यांच्याकडे मांडले आहेत.
मुंबई – सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून लोकांच्य मनावर अधिराज्य गाजवणारे अनेक कलाकार आहेत. त्याचं पध्दतीन किरण माने (kiran mane) हे आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत असतात. भूमिका मांडत असताना त्यांच्या समोर सामान्य माणूस आणि सत्तेत असलेल्या राजकीय (politics) नेत्यांना ते नाव न घेता टोमणे मारत असतात. याच कारणामुळे मला निर्मात्यांनी आणि चॅनेलने आपल्या मालिकेतून बाहेर काढल्याचे अभिनेते किरण माने यांचे म्हणणे आहे.
हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यामातून किरण मानेनी मांडल्यानंतर त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी सपोर्ट दर्शविला. तसेच त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.
आज सकाळी किरण माने यांनी एक पोस्ट केली, त्यामध्ये ते म्हणतात की आज प्रॉडक्शन हाऊसकडून माझ्या विरोधात कटकारस्थान रचलं जाणार आहे. त्यामुळे माझे सहकारी कलाकार माझ्यावरती त्यांच्या पोटावर पाय येऊ नये म्हणून जोरदार टिका करतील. पण तुम्ही अशा भंपक लोकांवर विश्वास ठेऊ नका, अशी विनंती त्यांनी केली आहे.
मुलगी झाली हो च्या निर्मात्यांनी किरण माने मला अपशब्द वापरले, ते सतत टाँट मारायचे, तसेच माझ्यामुळे मालिका चालते असं वारंवार म्हणायचे, त्यांची वर्तणूक चांगली नव्हती अशा पध्दतीचे गंभीर आरोप निर्मात्यांनी शरद पवार यांच्याकडे मांडले आहेत.
कलाकारांचे किरण मानेंवर गंभीर आरोप
किरण मानेंच्या विरोधात अनेक सहकलाकारांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे मालिका चालते, मी या मालिकेचा हिरो आहे, माझ्या मालिकेला हिरोईन नाही. तसेच माझ्यामनात आलं तर कधीही एखाद्या कलाकाराला बाहेर काढू शकतो. तसेच वारंवार अपशब्द वापरल्याचे सुध्दा कलाकारांचे म्हणणे आहे. निर्मात्यांनी शरद पवारांकडे आपलं गहाण मांडल्यानंतर शरद पवार या प्रकरणाकडे कसे पाहतात हे सुध्दा महत्त्वाचे ठरणार आहे.
मी अशा पध्दतीचं वर्तन कधीही केललं नाही तसेच अचानक मला काढून टाकल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा मला असलेला प्रतिसाद पाहून निर्माते हैराण झाले आहेत. त्यांनी माझ्या विरोधात कलाकारांना असं बोलायला भाग पाडल्याचं किरण मानेनी स्पष्ट केलं आहे.
Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’ Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही, डाॅक्टर म्हणाले सर्वांनी प्रार्थना करा!
लग्नाआधी शिबानी दांडेकरच्या टॅटूची हवा, पाहा काय खास आहे टॅटूमध्ये!