Sher Shivraj: ‘शेर शिवराज’ची डरकाळी आता OTT वर; ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार चित्रपट

दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतरचा हा चौथा सिनेमा आहे.

Sher Shivraj: 'शेर शिवराज'ची डरकाळी आता OTT वर; ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येणार चित्रपट
Sher ShivrajImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 7:35 AM

प्रेक्षक आणि समीक्षक अशा दोघांचेही कौतुक मिळवत जगभरात गाजलेला मराठी ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज (Sher Shivraj) आता प्रेक्षकांना घरबसल्या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या (Amazon Prime Video) माध्यमातून पाहता येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) लिखित आणि दिग्दर्शित हा भव्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका महत्त्वाच्या अध्यायावर आधारित आहे. शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतरचा हा चौथा सिनेमा आहे. शेर शिवराजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि धाडसी प्रसंगाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र आदिलशाहीच्या शासनाखाली चिरडून निघत होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं असामान्य बुद्धी चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर अफझल खानला हरवलं. चिन्मय मांडलेकर यांनी या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली असून मुकेश ऋषी बलशाली अफझल खानच्या भूमिकेत आहेत.

याविषयी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात महान राजांपैकी एक होते आणि त्यांचं आयुष्य अविस्मरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटनांनी भरलेलं आहे. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओशी सहकार्य केल्याचा मला खूप आनंद होत आहे, कारण त्यांच्या मदतीने आम्ही केवळ मराठी प्रेक्षकांपर्यंत नाही, तर जगभरातील इतिहास प्रेमींपर्यंत पोहोचू.’

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

मुंबई मूव्ही स्टुडिओजचे नितिन केणी, प्रद्योत पेंढारकर आणि राजवारसा प्रॉडक्शनचे अनिल नारायणराव वानखेडे आणि दिग्पाल लांजेकर आणि मुळाक्षरचे चिन्मय मांडलेकर यांनी शेर शिवराजची निर्मिती केली आहे. चिन्मय मांडलेकर आणि मुकेश ऋषी यांच्यासोबतच मृणाल कुलकर्मी, अजय पूरकर, बिपिन सुर्वे, रोहन मंकणी यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. हा ऐतिहासिक सिनेमा आता ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून भारत आणि 240 देशांत उपलब्ध करण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.