विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात “भोपाळी” म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम…

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत. मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपळी नाहीये. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे.

विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात भोपाळी म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम...
विवेक अग्निहोत्रीवर दिग्विजय सिंह संतापलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 3:20 PM

मुंबई : द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरून सध्या दोन गट पडले आहेत. एक गट म्हणतोय हे अर्धसत्य आहे. तर भाजप नेते यावर कौतुकाच्या फुलांचा वर्षाव करत आहेत. मात्र आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) एका वेगळ्याच वादामुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणत आहेत. मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपळी नाहीये. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजवेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक, असे म्हणताना ते दिसून येत आहे. त्यामुळे आता चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यावरून आक्रमक झाले आहे. त्यांनी तशाच शब्दात अग्निहोत्रींचा समाचार घेतला आहे.

अग्निहोत्रींवर दिग्विजय सिंह संतपाले

दिग्विजय सिंह यांनी विवेकवर निशाणा साधत ट्विट केले आहे. दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे की, विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळी रहिवाशाचा नाही. मी 77 पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिला असाल त्यामुळे हा “संगतीचा प्रभाव असू शकतो”. व्हायरल होत असलेले विवेक अग्निहोत्री यांचे विधान केव्हा आणि कोणत्या संदर्भात ते म्हणाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर विविक अग्निहोत्री यांच्या बाजुने अजून कोणतीही प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण आलेले नाही.

दिग्विजय सिंह यांचे ट्विट

चित्रपट चर्चेत आणि वादातही

विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास रिलीज झाल्यापासून हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 13 दिवसांत 200 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटातील स्टारकास्टच्या अभिनयापासून ते विवेक अग्निहोत्रीच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक होत आहे.‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन सध्या रोजदार चर्चा होतेय. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून केजरीवाल यांनीही भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

RRR Review in Marathi: राजामौली.. सिर्फ नाम ही काफी है! रामचरण-ज्युनियर एनटीआरची ‘पॉवरपॅक्ड’ जुगलबंदी

“तू जगातील सर्वोत्कृष्ट आई!”, बालपणीच्या आठवणींचा खजिना शेअर करत Sonam Kapoor कडून आई Sunita Kapoor ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.