मी पत्नी आहे पण.. दिलजित दोसांझच्या लग्नाचं सत्य आलं समोर; व्हायरल फोटोतील महिलेनं सोडलं मौन

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजित दोसांझच्या लग्नाविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दिलजितने काही वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केलं आणि त्याचा एक मुलगासुद्धा आहे, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर एक महिलेसोबत त्याचा फोटोसुद्धा व्हायरल होत आहे.

मी पत्नी आहे पण.. दिलजित दोसांझच्या लग्नाचं सत्य आलं समोर; व्हायरल फोटोतील महिलेनं सोडलं मौन
दिलजीत दोसांझसोबतच्या फोटोवर महिलेची प्रतिक्रियाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 10:13 AM

आंततराष्ट्रीय ख्यातीच्या म्युझिक फेस्टिव्हलपासून अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये आपल्या दमदार गायनकौशल्याने श्रोत्यांची मनं जिंकणारा पंजाबी गायक दिलजित दोसांझ सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिलजित विवाहित असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. दिलजितचा एक फोटोसुद्धा व्हायरल होत असून त्या फोटोत दिसणारी महिला दिलजितची पत्नी असल्याचा दावा केला जात आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर दिलजितचा एक मुलगाही असल्याचं समजतंय. आता या फोटोतील महिलेनं चर्चांवर मौन सोडलं आहे. दिलजितसोबत दिसणाऱ्या या महिलेचं नाव निशा बानो असं आहे.

निशाने सोशल मीडियावर तिच्या आणि दिलजितच्या लग्नाबद्दल व्हायरल होत असलेली पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘हाहाहाहा… या फोटोबद्दल कोणी मला तरी विचारा. पण नाही, त्यांनी तर मला थेट या व्यक्तीची पत्नी असं म्हटलंय. आता हा फोटो व्हायरल होतोय आणि मला अनेकांनी त्यांच्या पोस्टमध्ये टॅग केलंय. मात्र पंजाबींना ही गोष्ट माहित आहे की मी समीर माहीची पत्नी आहे. आता या बॉलिवूडकरांना कोण समजावणार?’ या पोस्टमध्ये निशाने तिचा पती समीर माहीलाही टॅग केलंय.

हे सुद्धा वाचा

एक आठवड्यापूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने म्हटलं होतं की अक्षय कुमार, करीना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजित दोसांझ या चौघांपैकी फक्त ती एकटीच अशी आहे, जिचं बाळ नाही. त्यामुळे दिलजितचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी दिलजितचा निशा बानो यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तीच पत्नी असल्याचं म्हटलंय.

दिलजित हा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. त्याने पंजाबीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचसोबत त्याची बॉलिवूड गाणीही प्रचंड हिट आहेत. जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात दिलजितने परफॉर्म केलं होतं.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.