एका मुलाचा बाप आहे दिलजीत दोसांझ, गुपचूप केलंय लग्न! कुठे आहे पत्नी?

भारतात नाही तर 'या' देशात राहतं दिलजीत दोसांझ याचं कुटुंब, गायक एका मुलाचा बाप, तर कुठे आहे पत्नी? दिलजीत दोसांझ कायम स्वतःच्या कुटुंबाला लाईमलाईटपासून दूर ठेवतो... आता त्याच्या कुटुंबाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिलजीत याची चर्चा...

एका मुलाचा बाप आहे दिलजीत दोसांझ, गुपचूप केलंय लग्न! कुठे आहे पत्नी?
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 11:05 AM

मुंबई | 19 मार्च 2024 : गायक दिलजीत दोझांज याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. दिलजीतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव फार मोठं केलं आहे. दिलजीतने फक्त गायन श्रेत्रात नाहीतर, अभिनय श्रेत्रात देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दिलजीतचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिलजीतचे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण आता दिलजीत त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

दिलजीत दोसांझ विवाहित असल्याची चर्चा रंगत आहे. रिपोर्टनुसार, दिलजीत याला एक मुलगा देखील आहे. पण गायकाने स्वतःच्या कुटुंबाला लाईमलाईटपासून दूर ठेवलं आहे. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर अभिनेत्री किआरा अडवाणी हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किआरा म्हणते दिलजीत एका मुलाचा बाप आहे. ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान किआरा हिने मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे आता दिलजीत चर्चेत आला आहे.

एका मुलाखतीत किआरा म्हणाली होती, तिच्या शिवाय सिनेमाच्या सेटवरील प्रत्येकाला त्यांची स्वतःची मुलं आहेत. यामध्ये दिलजीत देखील सामिल होता. कारण ‘गुड न्यूज’ सिनेमात दिलजीत देखील मुख्य भुमिकेत होता. तर एका मुलाखतीत खुद्द दिलजीत म्हणाला होता की, कुटुंबाला ट्रोल करतील याच भीतीने दिलजीत स्वतःच्या कुटुंबाला कायम लाईमलाईट पासून दूर ठेवतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिलजीत याचा मुलगा आणि पत्नीची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझ याची पत्नी आणि मुलगा अमेरिकेत राहतात. पण दिलजीत याने कधीच स्वतःच्या लग्नाबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नाही. आता दिलजीतच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या आहेत की नाही… हे फक्त गायकच सांगू शकतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिलजीत याची चर्चा रंगली आहे.

दिलजीत याने आतापर्यंत बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायली आहेत. दिलजीतच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आाहे. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील दिलजीत कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर दिलजीत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.