सनी देओलच्या प्रेमात वेडी होती डिंपल कपाडिया, विवाहित असूनही केले लग्न
अभिनेता सनी देओल याने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन लोकांच्या मनात मोठं स्थान मिळवलं आहे. आज त्याचे लाखो चाहते आहेत. आजही त्याचे चित्रपट मोठ्या आवडीने लोकं पाहतात. पण लोकांचा हा आवडता हिरो काही वर्षांपूर्वी त्याच्या लव्ह अफेअरमुळे देखील बराच चर्चेत होता. लग्नानंतर ही तो अभिनेत्रीला गुपचूपपणे भेटायचा. दोघांचा व्हिडिओ ही व्हायरल झाले होते.
Sunny Deol Dimple Kapadia Love Affair : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने अनेक सुपरहीट सिनेमे दिले आहेत. नुकताच त्याचा ‘गदर 2’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. सिनेमाच्या शुटींग दरम्यान चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे सिनेमाची उत्सूकता वाढली होती. सनी देओल सिनेमाशिवाय त्याच्या अफेअरमुळे ही चर्चेत राहतो. खूप कमी लोकांना माहित असेल की पूजासोबत लग्न होऊनही सनी देओलचे डिंपल कपाडियासोबत गुप्त अफेअर होते. त्यांच्या नात्याची बरीच चर्चा केली जाते.
सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे अफेअर
सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून अनेक चित्रपट हिट देखील ठरले आहेत ‘मंजिल-मंजिल’, ‘आग का गोल’, ‘गुनाह’, ‘नरसिंहा’ या सारखे चित्रपट त्यांनी दिले आहेत. या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान या दोघांचे अफेअर सुरू झाले होते. पण डिंपल कपाडियाचा विवाह राजेश खन्ना आणि सनी देओलचा पूजा देओलसोबत झाला होता. 1990 मध्ये या दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा होती. ज्यामुळे खळबळ देखील उडाली होती. दुसरीकडे काही वर्षांपूर्वीचा त्यांचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाले होता. ज्यामध्ये दोघेही परदेशात एकत्र दिसले होते. डिंपलच्या दोन मुली ट्विंकल आणि रिंकी सनी देओलला ‘छोटे पापा’ म्हणायचे.
लग्न केले असल्याची देखील चर्चा
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जातं की दोघांनी लग्न केलं होतं. पण सनी देओलची पत्नी पूजाने त्याला धमकी दिली होती की, जर त्याने हे नाते संपवले नाही तर ती त्याला घटस्फोट देईल आणि मुलांना घेऊन जाईल. त्यानंतर कुटुंब तुटण्याच्या भीतीने सनीने माघार घेतली आणि हे नाते इथेच संपले. काही काळानंतर ट्विंकल खन्नाही या नात्याला विरोध करू लागली. सनी देओल आणि डिंपलची प्रेमकहाणी पूर्ण झाली नसली तरी त्यांची मैत्री आजतागायत कायम आहे.