Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipika Kakar | ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्रीने दिली ‘गुड न्यूज’; झाली प्रीमॅच्युअर डिलिव्हरी

दीपिकाने 2010 मध्ये 'नीर भरे तेरे नैना देवी' या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ससुराल सिमर का, अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Dipika Kakar | 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्रीने दिली 'गुड न्यूज'; झाली प्रीमॅच्युअर डिलिव्हरी
Dipika Kakar and Shoaib IbrahimImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 2:23 PM

मुंबई : ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने नुकतीच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. दीपिका आणि शोएब इब्राहिम हे आई-बाबा झाले आहेत. आज (21 जून) दीपिकाने चिमुकल्या मुलाला जन्म दिला. याची माहिती खुद्द शोएबने सोशल मीडियाद्वारे दिली. विशेष म्हणजे कालच (20 जून) शोएबने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. दीपिकाने बुधवारी सकाळी बाळाला जन्म दिला. मात्र बाळाचा जन्म हा डिलिव्हरीच्या तारखेआधी झाल्याचं शोएबने सांगितलं आहे. तरी काळजी करण्याचं काही कारण नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. सध्या दीपिका आणि शोएब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बाळाची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी

‘आज 21 जून 2023 रोजी सकाळी दीपिकाने गोंडस मुलाला जन्म दिला. तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली आहे. मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही. आमच्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट शोएबने लिहिली आहे. मंगळवारी वाढदिवस साजरा करतानाही शोएबने बाबा होणार असल्याचा आनंद व्यक्त केला होता. ‘आयुष्याच्या नव्या टप्प्यात लवकरच प्रवेश करणार आहे. मी त्यासाठी फार उत्सुक आहे. मनात अनेक भावना आहेत आणि प्रचंड उत्सुकता आहे’, असं त्याने वाढदिवसाच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

या वर्षी जानेवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. गरोदरपणातील या काळात दीपिकाने विविध पोस्ट आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. दीपिका आणि शोएबने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

दीपिकाचा अभिनयक्षेत्राला रामराम

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नन्सी आणि अभिनयक्षेत्राला रामराम करण्याविषयी वक्तव्य केलं होतं. याविषयी पती शोएबशीही चर्चा केल्याचं तिने सांगितलं. “मी गरोदरपणाच्या या टप्प्याचा फार आनंद घेतेय. शोएब आणि माझी उत्सुकता वेगळ्याच पातळीवर आहे. मी फार कमी वयात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर सलग 10 ते 15 वर्षे मी काम केलं. गरोदर झाल्यानंतर मी शोएबला सांगितलं होतं की मला अभिनयक्षेत्र सोडायचं आहे. मला एक गृहिणी आणि आई म्हणून पुढचं आयुष्य जगायचं आहे”, असं ती म्हणाली.

दीपिकाने 2010 मध्ये ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ससुराल सिमर का, अगले जनम मोहे बिटियाँ ही किजो यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने झलक दिखला जा 8, नच बलिये 8 आणि एंटरटेन्मेंट की राज या रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला होता. तर बिग बॉसच्या बाराव्या सिझनची ती विजेती ठरली होती.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.