हाय हिल्समध्ये पडता पडता वाचली दीपिका; चाहत्याने केली मदत तर म्हणाली Don’t Touch Me

दीपिकाच्या उलट्या बोंबा; हाय हिल्समध्ये धडपडताना ज्याने वाचवलं त्याच्यावर चिडली, Video व्हायरल

हाय हिल्समध्ये पडता पडता वाचली दीपिका; चाहत्याने केली मदत तर म्हणाली Don't Touch Me
Dipika KakkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 12:49 PM

मुंबई: ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत भूमिका साकारत अभिनेत्री दीपिका कक्कर घराघरात पोहोचली. याच मालिकेतल्या शोएब इब्राहिमसोबत दीपिकाने दुसरं लग्न केलं. ही जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. मात्र या कार्यक्रमातून बाहेर निघताना हाय हिल्समुळे ती पडता पडता वाचली.

उंच टाचाच्या सँडलमुळे दीपिकाचा तोल ढासळला आणि ती धडपडली. मात्र ती खाली पडण्याआधी एका चाहत्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या चाहत्याने दीपिकाचा हात पकडला तेव्हा ती तिच्यावर चिडताना दिसली. “मी ठीक आहे, मी ठीक आहे, मला अशा पद्धतीने स्पर्श करू नका”, असं ती आधी म्हणाली. यावेळी दीपिकाच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट पहायला मिळत होता.

हे सुद्धा वाचा

दीपिकाचं ऐकल्यानंतर त्या चाहत्याने लांबच राहण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी दीपिकावर राग व्यक्त करत आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती पापाराझींना म्हणते, “ती व्यक्ती (शोएब अख्तर) पुरस्कार हातात घेऊन मागून येतेय. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना प्रश्न विचारा.” यानंतर ती गाडीजवळ निघून जाते.

दीपिकाचं हे वागणं योग्य नाही, अशी कमेंट नेटकरी करत आहेत. ‘ज्याने तुला पडण्यापासून वाचवलं, त्याच्यावरच तू चिडतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘ज्याचं करावं भलं, तो बोलतो माझंच खरं’ अशा शब्दांत दुसऱ्याने सुनावलं. ‘तुम्ही तिची मदतच का केली, पडायला पाहिजे होतं’, असं एकाने मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी लिहिलं.

दीपिकाने 2011 मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....