तो सतत मारहाण, शिवीगाळ करायचा कारण…, प्रसिद्ध अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप, व्हिडीओ व्हायरल

झगमगत्या विश्वात काम करणं अभिनेत्रींसाठी धोक्याचं? दिग्दर्शकाकडून प्रसिद्ध अभिनेत्रीला मारहाण, शिवीगाळ... एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्रीने सांगितली तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना... सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

तो सतत मारहाण, शिवीगाळ करायचा कारण...,  प्रसिद्ध अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 8:20 AM

मुंबई | 1 मार्च 2024 : झगमगत्या विश्वात काम करण्याची इच्छा अनेकांची असते. पण ग्लॅमरच्या या विश्वात अनेक नको त्या गोष्टी देखील घडत असतात. अभिनय क्षेत्रात काम केल्यामुळे प्रसिद्धी, लोकप्रियता तर मिळतेच, पण त्यासाठी अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो.. नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडल्याची महिती समोर येत आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना दिग्दर्शक अभिनेत्रीला सतत मारहाण आणि शिवीगाळ करायचा… सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने दिग्दर्शकावर आरोप केले आहे.

ज्या अभिनेत्रीने दिग्दर्शकावर मारहाण आणि शिवीगाळ करण्याचे आरोप केले आहेत. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, मल्याळम अभिनेत्री ममिता बैजू आहे. ममिता हिने दिग्दर्शक बाला याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही दोघं ‘वनंगान’ सिनेमासाठी काम करत होतो. पण दिग्दर्शकाच्या वाईट वर्तवणुकीमुळे मी सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. ‘

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभनेत्री मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शक बाला सतत सेटवर सतत मारहाण आणि शिवीगाळ करायचे. सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. तिच्यासोबत अभिनेता सूर्या देखील मुख्य भूमिकेत होता. पण दिग्दर्शकासोबत वाद झाल्यामुळे सूर्याने सिनेमा सोडण्याचा निर्णय़ घेतला.

अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमात मला विलादिचम्पातू नावाचा वाद्य वाजवण्याची तयारी करायची होती. त्यासाठी वाद्याची माहिती असलेल्या एका महिलेला देखील बोलावण्यात आलं होतं. बालाने मला त्या महिलेकडे पाहायला सांगितलं आणि म्हणाला आपण आता टेकसाठी तयार आहेत. पण माझ्या काही लक्षातच आलं नव्हतं…’

‘ती महिला काय गात आहे. काय करत आहे… मला काहीही कळत नव्हतं. अशात मी ते वाद्य कसं वाजवणार होती. मी तीन पेक्षा अधिक वेळा सीन करण्याचा प्रयत्न केला. पण मझ्याकडून होतच नव्हतं. तेव्हा बाला मला ओरडला, शिवीगाळ केली एवढंच नाही तर, त्याने मला मारलं देखील…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘बालाच्या स्वभावच तसा आहे. त्याने मला सांगितल होतं या सगळ्या गोष्टी मनावर लावून घेऊ नकोस. सूर्याला बालाच्या अशा स्वभावाबद्दल माहिती होतं. म्हणून त्याने देखील सिनेमा करणं सोडून दिलं. ‘ सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तर दिग्दर्शक बाला याला लोकं ट्रोल करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.