‘श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’, २५ ऑगस्टला गाजणार सिनेमागृह
'आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच...', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' सिनेमानंतर ‘सुभेदार’ सिनेमाची सर्वत्र चर्चा...

मुंबई : ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ सिनेमानंतर ‘सुभेदार’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २५ ऑगस्ट रोजी ‘सुभेदार’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचं टीझर प्रेक्षकांना पसंतीस पडला आहे. आता प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. इतिहासात असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. अशाच असंख्य मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे…. ‘सुभेदार’ सिनेमाच्या माध्यमातून सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच…’ असं म्हणत अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी एक महत्त्वाचं नाव आहे. आता सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. २५ ऑगस्ट २०२३ सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होईल.
View this post on Instagram
सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखण दिग्पाल लांजेकरच्या (digpal lanjekar) यांनी केलं आहे. ‘सुभेदार’ सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करत दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’…२५ ऑगस्ट ला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..’ सध्या सर्वत्र ‘सुभेदार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर देखील ‘सुभेदार’ सिनेमाच्या टीझरची चर्चा रंगत आहे. टीझर पाहिल्यानंतर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.. टीझरलाच मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता २५ ऑगस्टला सिनेमागृह गाजणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘खरच खूप उत्सुक आहे हा चित्रपट पाहायला , teaser पाहताना अंगावर काटा आला…, जय भवानी जय शिवराय’ असं एक नेटकरी ‘सुभेदार’ सिनेमाचं टीझर पाहिल्यानंतर म्हणाला आहे. तर अन्य एक युजर म्हणाला, ‘सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे…’ सध्या सर्वत्र ‘सुभेदार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.