Kaali: देवी कालीच्या हातात सिगारेट, LGBT चा झेंडा; पोस्टवरून नेटकऱ्यांमध्ये संताप, निर्मात्यांच्या अटकेची मागणी
या पोस्टरमध्ये माँ कालीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून हे पाहून सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत. माँ कालीच्या वेशभूषेतील अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ चा ध्वज घेऊन दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रणबीर मंदिरात बूट घालून प्रवेश केल्याचं दिसलं. त्यावरून नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. आता पुन्हा एकदा असंच प्रकरण समोर आलं आहे. चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या डॉक्युमेंटरी पोस्टरवरून ट्विटरवर वाद निर्माण झाला आहे. दिग्दर्शिका, कवयित्री आणि अभिनेत्री लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं आहे, ज्यामध्ये ‘मां काली’च्या (Kaali) वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढत असताना दिसतेय. अभिनेत्रीच्या एका हातात LGBTQ चा ध्वज आहे. या पोस्टवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. या पोस्टरला (Kaali Poster) प्रेक्षकांनी विरोध केला.
चित्रपट निर्मात्या लीना यांनी 2 जून 2022 रोजी ट्विटरवर माहितीपट कालीचं पोस्टर शेअर केला. ‘कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आली आहे. मी अत्यंत उत्साही आहे’, असं त्यांनी लिहिलं. लीना यांच्या या माहितीपटाचं नाव काली आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून हे पाहून सोशल मीडियावरील यूजर्स संतापले आहेत. माँ कालीच्या वेशभूषेतील अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ चा ध्वज घेऊन दिसत आहे.
लीना यांनी शेअर केलेली पोस्ट-
Super thrilled to share the launch of my recent film – today at @AgaKhanMuseum as part of its “Rhythms of Canada” Link: https://t.co/RAQimMt7Ln
I made this performance doc as a cohort of https://t.co/D5ywx1Y7Wu@YorkuAMPD @TorontoMet @YorkUFGS
Feeling pumped with my CREW❤️ pic.twitter.com/L8LDDnctC9
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 2, 2022
नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
… dare you do it with any other religion. Just try. And shame on the place which is supporting such depiction of Hindu goddess. @HCI_Ottawa you all can at least put a protest if you think this is fine than it’s a irony @reachind_USACAN
— Rajiv Mishra (@rajivmishra) July 3, 2022
Every day H!ndu religion is mocked, Is govt. testing our patience ??
Dear @AmitShah @HMOIndia @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia Please don’t forget how we were questioned for hurting religious sentiments & needful action must be taken.https://t.co/MkaarqeZFU
— Chandra Prakash Singh (@CpSingh9714) July 3, 2022
It’s insulting my faith. Please maintain law and order and take appropriate action. Section 295A of India penal code.
Ban this handle in India otherwise it will create unrest in India.
cc : @DelhiPolice @Uppolice @KirenRijiju @NIA_India @ianuragthakur @CPDelhi @AmitShah
— Chandrakant Sharma ??चंद्रकांत शर्मा (@chandrakant6785) July 3, 2022
सतत हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातात. ते आमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत, असं एका युजरने लिहिलं. इतकंच नाही तर संबंधित युजरने अमित शाहांपासून पंतप्रधान कार्यालयालाही टॅग करत पोस्टर आणि चित्रपटावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतर धर्माच्या देवदेवांना अशा प्रकारे धूम्रपान करताना दाखवण्याची हिंमत कराल का, असा सवाल एका युजरने केला. अशा दुष्कर्माची शिक्षा स्वत: माँ काली तुम्हाला देईल, अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. नेटकऱ्यांनी लीना यांच्या अटकेचीही मागणी केली.