The Kerala Story च्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलची चर्चा; दिग्दर्शकांकडून मोठा खुलासा
'सिनेमा यशस्वी होणार मला माहित होतं, कारण....', 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर सिनेमाच्या सीक्वलबद्दल दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याकडून मोठा खुलासा...
मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला भरभरून मिळणारा प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. सिनेमाच्या सीक्वलबद्दल सुदीप्तो सेन यांनी मोठी माहिती दिली आहे.
बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असलेल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. नुकताच सुदीप्तो सेन यांची एक मुलाखत सर्वत्र चर्चेत आहे. मुलाखतीत त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या सीक्वलबद्दल सांगितलं आहे. सुदीप्तो सेन म्हणाले, ‘माझ्याकडे अनेक कथा आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर मला आता शांत बसायचं नाही…’
सुदीप्तो सेन पुढे म्हणाले, ‘द केरळ स्टोरी सिनेमावर मी तब्बल सात वर्ष काम केलं आहे. मला माहिती होतं सिनेमाला यश मिळेल…’ दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या वक्तव्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या सीक्वलची चर्चा तुफान रंगत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा महिलांवर आधारित आहे. पुरुषांबाबत कथेमध्ये काही का दाखवण्यात आलं नाही?’ असा प्रश्न देखील दिग्दर्शकांना विचारण्यात आला…
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत सुदीप्तो सेन म्हणाले, ‘मुळात कथा सुरुवातीपासून तीन मैत्रिणींची होती. आता पुरुषांच्या कट्टरवादाबद्दल काही निर्मात्यांनी मला ‘द केरळ स्टोरी’चा सिक्वेल म्हणून एक सिनेमा ऑफर केला आहे.’ सुदीप्तो सेन यांच्या वक्तव्यानंतर सिनेमाच्या सीक्वलने जोर धरला आहे. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा सीक्वल कधी येणार… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
दरम्यान, अदा शर्मा स्टारर सिनेमा बॉक्स ऑफिसवर मजल मारताना दिसत आहे. सिनेमाने ९ दिवसांमध्ये १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केल्यामुळे निर्माते आणि सिनेमाच्या टीमला मोठा आनंद झाला आहे. शिवाय सिनेमाला प्रेक्षकांकडून देखील पसंती मिळत आहे. ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (The Kerala Story Box Ofiice Collection)