Rahul Vaidya | राहुल वैद्य लवकरच होणार बाबा; दिशा परमारने दिली ‘गुड न्यूज’

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांना एकमेकांच्या जवळ आणण्यात त्यांच्या मित्रांचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियानेही या दोघांच्या नात्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राहुल आणि दिशाची पहिली भेट एका कॉमन मित्राद्वारे झाली.

Rahul Vaidya | राहुल वैद्य लवकरच होणार बाबा; दिशा परमारने दिली 'गुड न्यूज'
Disha Parmar and Rahul VaidyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 10:04 AM

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला गायक राहुल वैद्य लवकरच बाबा होणार आहे. पत्नी दिशा परमारसोबतचा फोटो पोस्ट करत राहुलने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगतली. यासोबतच त्यांनी सोनोग्रामचाही फोटो पोस्ट केला आहे. राहुल आणि दिशावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दिशाचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय. तर राहुलच्या हातातील छोट्या पाटीवर ‘मम्मी अँड डॅडी’ असं लिहिलंय.

जास्मिन भसीन, नकुल मेहता, अदा खान, दिव्यांका त्रिपाठी, टोनी कक्कर, रश्मी देसाई, दृष्टी धामी, शालीन भनोट यांसारख्या सेलिब्रिटींनीही राहुल-दिशावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दिशा परमार आणि राहुल वैद्यने 16 जुलै 2021 रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. या दोघांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. दिशाने ‘प्यार का दर्द मिठा मिठा प्यारा प्यारा’ आणि ‘बडे अच्छे लगते है 2’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2012 मध्ये तिने अभिनयात पदार्पण केलं. तर 2005 मध्ये राहुलने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सिझनमध्ये भाग घेतला होता. यामध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर होता. ‘जान-ए-मन’ आणि ‘रेस 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने गाणी गायली आहेत. दिशा आणि राहुल नुकतेच ‘प्रेम कहानी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र झळकले होते.

हे सुद्धा वाचा

राहुल-दिशाची लव्हस्टोरी

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांना एकमेकांच्या जवळ आणण्यात त्यांच्या मित्रांचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियानेही या दोघांच्या नात्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. राहुल आणि दिशाची पहिली भेट एका कॉमन मित्राद्वारे झाली. दिशाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “मला त्याचं एक गाणं खूप आवडलं होतं आणि मी त्याच्या पोस्टवर लव्हची प्रतिक्रिया दिली.‘ त्याचवेळी राहुल म्हणाला होता की, “मला वाटलं की, ती इतकी सुंदर मुलगी आहे तर मी संधी कशी सोडू? मी दिशाला लगेच मेसेज केला आणि त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली. मी ‘याद तेरी’ गाण्याचं शूटिंग दिल्लीत करत असताना आमची पहिली भेट झाली.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.