Disha Patani | दिशा पटानीने बिकिनीतल्या फोटोमध्ये दाखवले स्ट्रेच मार्क्स; नेटकरी करतायत कौतुक

अनेकदा सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे फक्त एडिट केलेले फोटो पोस्ट करतात. मात्र दिशाने या फोटोमध्ये तिचे स्ट्रेच मार्क्स लपवले नाहीत. तिने इन्स्टाग्रामवर ॲनिमल प्रिंट बिकिनीमधील एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोसाठी तिने कोणत्याच फिल्टरचा वापर केलेला नाही.

Disha Patani | दिशा पटानीने बिकिनीतल्या फोटोमध्ये दाखवले स्ट्रेच मार्क्स; नेटकरी करतायत कौतुक
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:52 AM

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सौंदर्यामुळे आणि फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती अनेकदा बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. मात्र यावेळी तिने पोस्ट केलेल्या फोटोमुळे नेटकरी तिचं कौतुक करतायत. कारण अनेकदा सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे फक्त एडिट केलेले फोटो पोस्ट करतात. मात्र दिशाने या फोटोमध्ये तिचे स्ट्रेच मार्क्स लपवले नाहीत. तिने इन्स्टाग्रामवर ॲनिमल प्रिंट बिकिनीमधील एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या फोटोसाठी तिने कोणत्याच फिल्टरचा वापर केलेला नाही.

दिशाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये तिच्या पाठीवर स्ट्रेच मार्क्स पहायला मिळत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी हिंमत लागते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ‘हे दाखवण्यासाठी धन्यवाद, स्ट्रेच मार्क्स सर्वसामान्य असतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला हा फोटो खूप आवडला, कारण तो कोणत्याही फिल्टरशिवाय क्लिक केलेला आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘दिशा पटानीच्या शरीरावरही स्ट्रेच मार्क्स आहेत, त्यामुळे मी आता शांतपणे जगू शकते’, असंही नेटकऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो

दिशा लवकरच अभिनेता सूर्यासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन सिरुथई शिवाने केलंय. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘सुरिया 42’ असं ठेवण्यात आलं होतं. याशिवाय ती करण जोहरच्या ‘योद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिशाच्या हाती ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपटसुद्धा आहे. यामध्ये ती दीपिका पदुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिशा तिच्या खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनी कधी माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नव्हती. आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे.

ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.