Disha Patani | ‘पश्चातापासाठी आयुष्य लहान…’, अचानक सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल असं का म्हणाली दिशा पटानी?
Disha Patani | सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत खास व्हिडीओ पोस्ट करत दिशाने व्यक्त केल्या भावना, पण 'पश्चातापासाठी आयुष्य लहान...' असं का म्हणाली अभिनेत्री? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत सिंह राजपूत आणि दिशा पटानी यांच्या व्हिडीओची चर्चा...
मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने आतापर्यंत अनेक सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिशा हिने अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारली, पण ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमातील तिच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा सुशांत आणि दिशा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सात वर्ष पूर्ण झाली आहेत. अशात अभिनेत्री सुशांत याच्या आठवणीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे. अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सिनेमातील एका व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘उत्तम प्रवास आण हिंदी सिनेविश्वातील माझ्या पहिल्या सिनेमासाठी आभारी आहे. पूर्ण मनापासून प्रेम करा आणि ज्यांनी तुम्हाला आयुष्यात आनंदी कसं राहायचं शिकवलं आहे, त्यांना कधीही गमावू नका. पश्चातापासाठी आयुष्य खूप लहान आहे. मला आशा आहे जिथे कुठे असशील तिथे आनंदी असशील…’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
दिशा हिच्या पोस्टवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत अभिनेते अनिल कपूर म्हणाले, ‘फिनॉमिनल सीन… तुम्ही दोघेही फार चांगले आहात…’ तर एक नेटकरी कमेट करत म्हणाला, ‘मिस यू एसएसआर’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दिशा हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा
दिग्दर्शक नीरज पांडे दिग्दर्शित, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा आपल्या देशातील सर्वात क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने धोनीची भूमिका केली होती. कियारा अडवाणी देखील सिनेमात होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केलीय
सुशांत सिंह राजपूत याचं निधन
सुशांत याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एक दिवस असा आला जेव्हा सुशांत याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आज अभिनेता जगात नसला तरी सेलिब्रिटी आणि चाहते सुशांत याच्या आठवणीत भावुक होतात.