Disha Patani | अखेर दिशा पटानीने जाहीरपणे कबुल केलं प्रेम; टायगर श्रॉफनंतर ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट

ब्रेकअपनंतरही दिशा आणि टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. इतकंच नव्हे तर कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान दिशा ही टायगरच्याच घरात राहत होती. जवळपास सहा वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

Disha Patani | अखेर दिशा पटानीने जाहीरपणे कबुल केलं प्रेम; टायगर श्रॉफनंतर 'या' अभिनेत्याला करतेय डेट
अखेर दिशा पटानीने जाहीरपणे कबुल केलं प्रेमImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 1:18 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी इन्स्टाग्रामवर ती बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे तर कधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तोकडे कपडे परिधान केल्यामुळे दिशा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या जोडीला चाहत्यांकडूनही पसंती मिळाली होती. मात्र आता टायगरचेच चाहते दिशावर नाराज झाले आहेत. दिशाचा एक व्हिडीओ पापाराझी अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमुळे दिशाला ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे दिशासोबत या व्हिडीओमध्ये तिचा नवीन बॉयफ्रेंडसुद्धा पहायला मिळत आहे.

टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. त्याचं नाव नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. पहिल्यांदाच दिशा आणि ॲलेक्झांडर पापाराझींना एकत्र दिसले. एका पार्टीला हे दोघं एकत्र आले आणि त्यावेळी मैत्रिणीला दिशाने तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून दिली. ‘हा माझा बॉयफ्रेंड आहे’ असं ती तिच्या मैत्रिणीला सांगते. त्यामुळे दिशाने अप्रत्यक्षपणे तिचं नातं जाहीर केल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे. ॲलेक्झांडर हा जिम ट्रेनरसुद्धा आहे. सर्बियाचा राहणारा ॲलेक्झांडर हा अभिनेतासुद्धा आहे. सध्या तो मुंबईत राहतोय. ॲलेक्झांडरने शॅमलॉन (Chameleon) या वेब सीरिजमध्ये काम केलंय. अभिनयापेक्षा तो त्याच्या फिटनेससाठी अधिक ओळखला जातो. इन्स्टाग्रामवर त्याचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

याआधी 22 नोव्हेंबर 2022 रोजी अभिनेता कार्तिक आर्यनच्या बर्थडे पार्टीमध्ये दिशा आणि ॲलेक्झांडर एकत्र दिसले. टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा यांच्यासोबतही ॲलेक्झांडरची चांगली मैत्री आहे. इतकंच नव्हे तर क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकशीही त्याची खास मैत्री आहे.

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांची पहिली भेट ‘बेफिक्रे’ या म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी ‘बागी 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं. ‘बागी 3’मधील खास गाण्यासाठीही दिशाने शूटिंग केली होती. एकत्र काम करता करता दोघांमधील जवळीक वाढली. या दोघांना अनेकदा डिनर डेटवर गेल्याचं पहायला मिळालं. टायगरच्या कुटुंबीयांसोबत विशेषकरून त्याच्या बहिणीसोबत दिशाची चांगली मैत्री झाली. ब्रेकअपनंतरही दिशा आणि टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. इतकंच नव्हे तर कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान दिशा ही टायगरच्याच घरात राहत होती. जवळपास सहा वर्षे हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.