Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वत:च तिकिटं खरेदी करून..’; अभिनेत्रीचा आलिया भट्टवर आरोप, शेअर केला रिकाम्या थिएटरचा फोटो

आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा 'जिगरा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून अभिनेत्री दिव्या खोसलाने आलियावर निशाणा साधला आहे. दिव्या ही 'टी सीरिज'चे निर्माते भूषण कुमार यांची पत्नी आहे.

'स्वत:च तिकिटं खरेदी करून..'; अभिनेत्रीचा आलिया भट्टवर आरोप, शेअर केला रिकाम्या थिएटरचा फोटो
Divya Khossla and Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 1:53 PM

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच आता ‘टी सीरिज’च्या भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने आलियावर निशाणा साधला आहे. आलियाच्या ‘जिगरा’ची कथा ही आपल्या ‘सावी’ या चित्रपटासारखीच असल्याचा दावा तिने केला आहे. इतकंच नव्हे तर तिने आलियावर बनावट कलेक्शन दाखवल्याचाही आरोप केला आहे. दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये थिएटरमधील फोटो शेअर केला आहे. आलियाचा ‘जिगरा’ पहायला थिएटरमध्ये कोणीच जात नसतानाही अभिनेत्रीकडून कलेक्शनचा बनावट आकडा जाहीर केला जात असल्याचा आरोप दिव्याने केला आहे.

दिव्या खोसलाची पोस्ट-

‘जिगराचा शो पाहण्यासाठी सिटी मॉलमधील पीव्हीआरमध्ये गेली होती. थिएटर पूर्ण रिकामा होता. इतर ठिकाणीही या शोचे थिएटर पूर्णपणे रिकामे आहेत. आलिया भट्ट तुझ्यात खरंच खूप ‘जिगरा’ आहे. स्वत:च तिकिटं विकत घेतली आणि बनावट कलेक्शन जाहीर केले. आता पेड मीडिया का शांत आहे याचं आश्चर्य वाटतंय’, अशी पोस्ट दिव्याने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

याविषयी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली होती, “सावी आणि जिगरा हे दोन्ही चित्रपट प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत सारखेच दिसत आहेत. मी फक्त हेच म्हणेन की प्रेक्षकांचं प्रेम आणि देवाच्या कृपेने सावी या चित्रपटाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं. या चित्रपटाने थिएटर आणि ओटीटीवर चांगली कामगिरी केली. आम्ही बऱ्याच देशांमध्ये टॉपला होतो. जिगरा हा चित्रपट जरी सावीसारखा असला तरी मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटाला आपला एक प्रवास असतो. कधीकधी दोन प्रॉडक्शन हाऊस एकसारख्या कथेवर चित्रपट बनवू शकतात.”

‘जिगरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या मुख्य भूमिका आहेत. वसन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियाने सत्याची भूमिका साकारली आहे. एका दक्षिणपूर्व आशियाई देशात अटक झाल्यानंतर भावाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या बहिणीची (सत्या) ही कथा आहे. या चित्रपटात आलिया आणि वेदांगसोबतच मनोज पाहवा यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच ॲक्शनपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे.

पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.