‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचं ‘ससुराल सिमर का 2’मधील अभिनेत्याशी लग्न

'दिया और बाती हम' फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा सिंह ही 'ससुराल सिमर का 2' फेम अभिनेता करण शर्माशी दुसरं लग्न करणार आहे. करणचंही हे दुसरं लग्न आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस करण आणि पूजाचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

'दिया और बाती हम' फेम अभिनेत्रीचं 'ससुराल सिमर का 2'मधील अभिनेत्याशी लग्न
Karan Sharma and Pooja SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 9:08 AM

मुंबई : 15 मार्च 2024 | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी चांदना नुकतीच लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेत्री आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘दिया और बाती’ फेम अभिनेत्री पूजा सिंग ही ‘ससुराल सिमर का2’मध्ये विवानची भूमिका साकारलेला अभिनेता करण शर्माशी लग्नगाठ बांधणार आहे. मार्चच्या अखेरीस हा लग्नसोहळा पार पडणार आहे. 29 मार्चपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. तर 30 मार्च रोजी करण आणि पूजा विवाहबंधनात अडकणार आहेत. उत्तर भारतीय विवाहपद्धतीनुसार सर्व विधी पार पडणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दोघांनी लग्नाविषयीची माहिती दिली.

या मुलाखतीत करणसोबतच्या पहिल्या भेटीविषयी पूजा व्यक्त झाली. ती म्हणाली, “हे सर्वकाही स्वप्नवत आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून तो या टीव्ही इंडस्ट्रीत काम करतोय. मात्र आमची कधीच भेट झाली नव्हती. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. हे एका अरेंज मॅरेजप्रमाणेच होतं. आता ते सर्वकाही जणू स्वप्न असल्याचाच भास होतो. पण आम्ही एकत्र येणं कदाचित आधीच ठरलं होतं. नियतीने आम्हाला एकत्र आणलं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आम्ही भेटलो आणि त्यानंतर एकमेकांना डेट केलं. या तीन महिन्यांतच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Pooja Singh (@poojaa_singh_)

करणचं हे दुसरं लग्न आहे. त्याने 2016 मध्ये टियारा करशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 2019 मध्ये करण आणि टियारा विभक्त झाले. करणसारखंच पूजाचंही हे दुसरं लग्न आहे. तिने आधी कपिल चट्टानीशी लग्न केलं होतं. दुसऱ्या लग्नाविषयी पूजा म्हणाली, “माझा आणि करणचा एक भूतकाळ आहे, जो विसरून आम्हाला नवी सुरुवात करायची आहे. एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी तुम्हाला फार काळ लागत नाही. म्हणूनच या तीन महिन्यांत आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.”

करणने दीपिका कक्कर फेम ‘ससुराल सिमर का 2’ या मालिकेत विवानची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. तर दुसरीकडे पूजाने ‘दिया और बाती हम’ या मालिकेत एमिली राठीची भूमिका साकारली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.