जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटगृहात गेले, एक उंदीर त्यांच्या बेल बॉटममध्ये घुसला आणि…
बिग बी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात, आता देखील त्यांनी त्यांच्या बेल बॉटमबद्दल एक मजेदार गोष्ट चाहत्यांना सांगितली...
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनय, डान्स, विनोदबुद्धीच्या माध्यमातून बिग बींनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, आता अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. बिग बींच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बिग बी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. आता बिग बी यांनी ४३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दो और दो पांच’ (Do Aur Do Paanch) सिनेमातील एक किस्सा सांगितला आहे.
४३ वर्ष जुन्या‘दो और दो पांच’ सिनेमाच्या आठवणीत अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केला आहे. बिग बींनी एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बिग बी एका खास पोजमध्ये दिसत आहेत. फोटो पोस्ट करत बिग बींनी कॅप्शनमध्ये, ‘२ + २ = 5 चे ४३ वर्ष… ‘दो और दो पांच’ सिनेमात प्रचंड मज्जा केली. बेल बॉटम आणि सर्वकाही… तेव्हा बेल बॉटमचा काळ होता… एक दिवस सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलो आणि उंदीर माझ्या बेल बॉटममध्ये घुसला… त्यासाठी बेल बॉटमला धन्यवाद…’ सध्या बिग बींची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
बिग बींच्या पोस्टवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि बेल बॉटमबद्दल केलेला खुलासा प्रचंड आवडला आहे. बिग बींचा एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘जुनं ते सोनं… ९० च्या दशकातील अमिताभ बच्चन जबरदस्त लूक…’, दुसऱ्याने लिहिलं, ‘तुमचा सिनेमा ‘दो और दो पांच’ सारखाच मजेदार…’ तर तिसऱ्या चाहत्याने कमेंट करत हे सत्य आहे का? असा प्रश्न चाहत्यांना विचारला.
आज बिग बी त्यांच्या सोशल मीडियापोस्टमुळे चर्चेत असतात, पण एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असायचे. वर्ष सरतं तशी फॅशन देखील बदलते. एक काळ असा होता, जेव्हा बेल बॉटमची स्टाईल सर्वत्र चर्चेत होती. आता देखील बेल बॉटमची फॅशन ट्रेंड करत आहे. सर्वप्रथम बेल बॉटमची फॅशन ‘दो और दो पांच’ सिनेमामुळे प्रसिद्धीस आली. ‘दो और दो पांच’ सिनेमा १० फेब्रुवारी १९८० मध्ये प्रदर्शित झाला होता. (amitabh top 10 movies)