मुंबई – भारतरत्न लता मंगेशकरांनी (lata mangeshkar) रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ही बातमी अखंड देशभर वा-यासारखी पसरली. निराश झालेल्या अनेक मान्यवरांनी मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital) जाऊन अंतिम दर्शन घेतलं. तर काही मान्यवरांनी लता दीदींच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतलं, तसेच काही जणांनी शिवाजी पार्क (shivaji park) परिसरात अंत्यविधीच्या आगोदर श्रध्दांजली वाहिली. अंत्यदर्शन घेण्यासाठी बाहेरून अनेकजण येणार असल्याने शिवाजी पार्क परिसरात कडक बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता.
अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या शाहरूख खान आणि पूजा ददलानी सुध्दा आल्या होत्या. शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
VIDEO : Raj Thackeray यांनी वाहिली Lata Mangeshkar यांना आदरांजली | Lata Didi | Dadar Shivaji Park #LataMangeshkar #LataDidi #लतामंगेशकर #लतादीदी #RIP_LataDidi
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/EG9RycPyWE
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 6, 2022
इस्लाम धर्मात फुंक मारण्याची पंरपरा आहे का ?
इस्लामिक धर्माच्या पध्दतीनुसार तुम्ही एखादी प्रार्थना करीत असता, त्यावेळी तुमचे दोन्ही हात तुम्हाला छातीवर पकडून तुम्हाला अल्लासाठी प्रार्थना करावी लागते. मग ती एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी प्रार्थना असेल किंवा नोकरीसाठी प्रार्थना तसेच एखाद्याच्या आत्म्यशांतीसाठी प्रार्थना अशा पध्दतीचं काहीही असू शकतं. दोन्ही हात जोडून प्रार्थना करत असल्याचे चित्रही चित्रपटांमध्ये आपल्या अनेकदा पाहायला मिळते. लता दीदींच्या पार्थिवासमोर शाहरुखन खानने काल हेच केले होते. लता दीदींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याने प्रार्थना केली.
काल लता दीदींच्या पार्थिवासमोर शाहरुख जेव्हा दोन्ही हात पसरून प्रार्थना करत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क होता. त्याने सुमारे 12 सेकंद प्रार्थना केली आणि नंतर तोंडावरचा मास्क काढून टाकला. मास्क काढल्यानंतर त्याने किंचित वाकून लतादीदींच्या अंगावर फुंकर मारली. इस्लामिक धर्माच्या अनुशंगाने ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच ही गोष्ट तुम्हाला एखाद्या मस्जिद किंवा दर्गात पाहायला मिळते. आई-वडिल आपल्या मुलांसाठी मौलाना यांच्याकडून प्रार्थना करतात. हे मोठ्या लोकांसाठी सुध्दा होऊ शकतं. तसेच अशी प्रार्थना कोणत्याही माणसासाठी केली जाऊ शकते.
भाजपच्या हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांनी फुंकीला थुंकणे असे म्हणत प्रश्नही विचारले आहेत, त्यांनी हा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारला असल्याने शाहरूखचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
इस्लामिक धर्म काय म्हणतो
“जेव्हा कोणी आजारी असेल किंवा एखाद्याला नजर लागली तर त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली जाते त्या पार्थनेला ‘दम’ असे म्हणतात. म्हणजे, जर एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना केली गेली असेल, तर ती प्रार्थना म्हणटल्यानंतर, फुंक मारली जाते. तसेच केलेल्या प्रार्थनेचा परिणाम आजारी माणसाच्या शरीरापर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग आहे, असे म्हणतात. म्हणजेच, प्रार्थनेत वाचलेल्या कुराणच्या श्लोकाचा प्रभाव त्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग आहे. पण असं आवश्यक नाही की दुआ वाचली आणि फुंकली तरच तिचा परिणाम होतो, परंतु ही प्रार्थना करण्याचा एक मार्ग आहे.” अशी इस्लाम धर्माची पंरपरा आहे.
काही लोक फुंकून जादू करतात, ज्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना आणि फुंकण्याची पद्धत देखील स्वीकारली गेली आहे. म्हणजेच फुंकण्याचा उद्देश कुराणात एखाद्याला मदत करणे किंवा कोणत्याही दुःखातून मुक्त होणे असा आहे असं इस्लामिक धर्म म्हणतो
जर एखाद्याला त्रास होत असेल किंवा एखादी समस्या असेल तर त्याने सर्वप्रथम देवाकडे पार्थना करावी. वेगवेगळ्या आजारीसाठी वेगवेगळ्या प्रार्थना वाचून केल्या जातात. त्याचप्रमाणे व्यवसाय किंवा अन्य एखाद्या गोष्टीसाठी वेगळ्या पध्दतीने पार्थना केली जाते. समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यासाठी सुध्दा प्रार्थनेची पध्दत वेगळी अनुसरली जाते अशी इस्लाम धर्माची धारणा आहे. त्यामुळे शाहरुखनेही असाच श्लोक वाचून लता दीदींसाठी प्रार्थना केल्याची शक्यता आहे.
तसेच शाहरूख खानने काल ज्या पध्दतीने प्रार्थना केली ती फक्त जिवंत माणसासाठी केली जाते. शाहरुख खान हा अभिनेता असून त्याने सामाजिक जबाबदारी पार पाडत हे कृत्य केले आहे, त्यामुळे त्याला धर्माशी जोडणे योग्य नाही, असे मौलानांचे म्हणणे आहे.
ज्यावेळी शाहरूख खानने लता दीदींच्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळी शाहरूखचा हात सरळ लता दीदींच्या पायाला स्पर्श करण्याकडे गेला आणि शाहरूखने लती दीदींच्या शवाचा नमस्कार केला. त्यावेळी मॅनेजर पूजा ददलानी सुध्दा सोबत होती. तसेच पूजा हात जोडून लता दीदींसाठी देवाला प्रार्थना करत होती. श्रद्धांजलीच्या वेळी दोन जवळची माणसं वेगवेगळ्या पध्दतीने पार्थना करीत असल्याचे आपणास पाहायला मिळालं.