Akanksha Dubey | ‘तुझी भीती खरी ठरली’, आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन डेनिमित्त आकांक्षाने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंहसोबतचा फोटो पोस्ट करत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Akanksha Dubey | 'तुझी भीती खरी ठरली', आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Akanksha Dubey Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 10:33 AM

मुंबई : रविवारी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. आकांक्षाने तिचं आयुष्य का संपवलं असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. कमी वयात तिने फिल्म इंडस्ट्रीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. यादरम्यान आता एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘तुझी भीती खरी ठरली’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. यासोबतच आकांक्षाचा फोटो तिने पोस्ट केला आहे. काजल राघवानी असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे. त्यामुळे काजलला आकांक्षाच्या आत्महत्येमागील कारण माहीत होतं का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काजल राघवानीची पोस्ट-

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येमुळे भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीला मोठा धक्का बसला. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आज तुझी भीती खरी ठरली आणि तू तुझ्या शौर्यासमोर तू भीतीला जिंकू दिलंस. दुसऱ्या शूटिंगला जाण्यापूर्वी तू तुझ्या भावना सर्वांसोबत शेअर केल्या होत्या’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पुढे तिने लिहिलं, ‘ज्या गोष्टीची भीती होती, तुला ज्या गोष्टीची चिंता होती.. आता कदाचित ती होणार नाही. त्यामुळे आता जिथे कुठे असशील तिथे धाडसाने राहा आणि आपल्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण कर. तुला इथे जो आनंद मिळाला नाही, तो सर्व तुला मिळू दे. पण जे काही असेल, मी यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही की तू स्वत:चं आयुष्य संपवू शकतेस. बाकी देव आहे आणि तुझ्या जिवाची किंमत आज नाही तर उद्या ते नक्कीच चुकवतील.’

‘खऱ्या प्रेमाची किंमत जीव देऊन किंवा कोणाचा जीव घेऊन चुकवायची नसते’, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलंय. काजलच्या या पोस्टने चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. तिची ही पोस्ट वाचल्यानंतर नेटकरी असा अंदाज वर्तवत आहेत की आकांक्षाने तिच्या प्रेमामुळेच आत्महत्या केली असावी.

फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन डेनिमित्त आकांक्षाने तिचं रिलेशनशिप स्टेटस जाहीर केलं होतं. सहकलाकार समर सिंहसोबतचा फोटो पोस्ट करत तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं. तिच्या मृत्यूनंतर आता चाहते समर सिंहवरही बरेच प्रश्न उपस्थित करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.