डॉली चायवाला याची खतरनाक मागणी, हैराण करणारे आरोप, एका शोसाठी तब्बल…

डॉली चायवाला हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. डॉली चायवाला याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर डॉली चायवाला अगदी कमी कालावधीमध्ये खूप जास्त प्रसिद्ध झालाय. डॉली चायवाला याची चहा पिण्यासाठी लोक विदेशातून भारतात येतात.

डॉली चायवाला याची खतरनाक मागणी, हैराण करणारे आरोप, एका शोसाठी तब्बल...
dolly chaiwala
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 5:55 PM

डॉली चायवाला हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा विषय आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी भारतात आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे थेट नागपूरचा डॉली चायवाला याचा चहा पिण्यासाठी त्याच्या टपरीवर पोहोचले. बिल गेट्स आणि डॉली चायवाला यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. डॉली चायवाला हा अत्यंत खास पद्धतीने चहा बनवतो आणि आपल्या ग्राहकांना देतो. मात्र, त्याची चहा तयार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. अत्यंत कमी दिवसांमध्ये डॉली चायवाला हा खूप प्रसिद्ध झालाय. लोक विदेशातूनही डॉली चायवाल्याचा चहा घेण्यासाठी स्पेशल येत आहेत.

डॉली चायवाला आता एक सेलिब्रिटी बनला आहे. डॉली चायवाला कोणत्याही शोमध्ये जाण्यासाठी मोठी फीस घेतो. आता नुकताच डॉली चायवाला याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय. यानंतर लोकांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा कुवेती फूड व्लॉगरने केलाय.

AK Food Vlog च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फूड व्लॉगरने डॉली चायवाला याच्याबद्दल हा खुलासा केलाय. त्याने म्हटले की, मला डॉली चायवाला याला कुवेतला बोलवायचे होते. मी डॉली चायवाला याला फोन केला. त्या व्यक्तीच्या मागण्या ऐकून मलाच मोठा धक्का बसला. फूड व्लॉगर फखरूद्धीन याने म्हटले की, तो डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल 5 लाख रूपये फीस घेतो.

हेच नाही तर त्याला 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेलचे बुकिंग पाहिजे. यासोबतच त्याच्यासोबत एक व्यक्तीही असणार त्याचीही सर्व व्यवस्था करायची.  त्याने खरोखरच हेच सांगितले मला फोनवर. मी माझी ओळख सांगूनही तो मला बोलला नाही तर त्याचा मॅनेजर बोलला. पाच लाख रूपये फीस ही फक्त एका दिवसाची असणार हे देखील मला सांगण्यात आले.

डॉली चायवाला याच्याबद्दलच्या हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 कोटी लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओनंतर प्रश्न विचारला जातोय की, खरोखरच डॉली चायवाला हा इतकी जास्त फीस घेतो? मात्र, याबद्दल अजूनही डॉली चायवाला याच्याकडून काहीच खुलासा हा करण्यात नाही आला. डॉली चायवाला याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.