Drishyam 2: ‘दृश्यम 2’ची जबरदस्त ॲडव्हान्स बुकिंग; जाणून घ्या प्रदर्शनाआधीची कमाई
प्रदर्शनाच्या एक दिवस आधी 'दृश्यम 2'ने रचला विक्रम; भुल भुलैय्या 2, RRR ला टाकलं मागे
मुंबई: ‘दृश्यम 2’ हा चित्रपट आज (18 नोव्हेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सात वर्षांपूर्वी या चित्रपटाचा पहिला भाग ‘दृश्यम’ प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली होती. मात्र या चित्रपटाची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. आता या सीक्वेलच्या ॲडव्हान्स बुकिंगविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत भुल भुलैय्या 2 आणि RRR (हिंदी) या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला याआधी इतका चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे ‘दृश्यम 2’ने हा नवा विक्रम रचला आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस थिएटर्समध्ये गुरुवारी या चित्रपटाची 1.16 लाख तिकिटं विकली गेली. ॲडव्हान्स बुकिंगमधून जवळपास सहा कोटी रुपयांची कमाई होणार असल्याचा अंदाज आहे.
या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा-
ब्रह्मास्त्र- 3.02 लाख दृश्यम 2- 1.16 लाख भुल भुलैय्या 2- 1.03 लाख लाल सिंग चड्ढा- 63 लाख विक्रम वेधा- 59 हजार जुग जुग जियो- 57 हजार गंगुबाई काठियावाडी- 56 हजार शमशेरा- 46 हजार सम्राट पृथ्वीराज- 41 हजार राम सेतू- 39 हजार
#OneWordReview…#Drishyam2: POWER-PACKED. Rating: ⭐⭐⭐⭐️#AjayDevgn. #AkshayeKhanna. #Tabu. #ShriyaSaran… Powerhouse actors in a power-packed film… Director #AbhishekPathak delivers a fantastic thriller… The fiery confrontations cast a spell… DON’T MISS. #Drishyam2Review pic.twitter.com/9m150S1RJk
— taran adarsh (@taran_adarsh) November 17, 2022
2015 मध्ये ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. आता पुन्हा एकदा त्यांनी याच चित्रपटाच्या सीक्वेलचा हिंदी रिमेक बनवला आहे. मात्र रिमेक असला तरी ‘दृश्यम 2’च्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू, अक्षय खन्ना, इशिता दत्ता, योगेश सोमण यांच्या भूमिका आहेत.