Drishyam 2: ‘मंडे टेस्ट’मध्ये पास झाला अजय देवगणचा ‘दृश्यम 2’; कमावले इतके कोटी रुपये

आमिर-हृतिकवर भारी पडला अजय देवगण; बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2'ची जादू कायम

Drishyam 2: 'मंडे टेस्ट'मध्ये पास झाला अजय देवगणचा 'दृश्यम 2'; कमावले इतके कोटी रुपये
Drishyam 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 10:43 AM

मुंबई: सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण असा अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीही या चित्रपटाची नॉन-स्टॉप कमाई सुरू आहे. चौथ्या दिवशी दुहेरी आकड्यात कमाई केल्याने ‘मंडे टेस्ट’मध्ये हा चित्रपट पास झाला आहे. 2015 मध्ये ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सात वर्षांनंतर त्याचा हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हे दोन्ही चित्रपट मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत.

सात वर्षांनंतर विजय साळगावकर यांचं कुटुंब परतलं आहे. त्याच्या कुटुंबाची ही कथा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. पहिल्या वीकेंडचे बरेच शो हाऊसफुल झाले होत. त्यानंतर सोमवारीसुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हे सुद्धा वाचा

‘दृश्यम 2’ने सोमवारी 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या चार दिवसांच्या कमाईचा आकडा हा 75.64 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कमाईची हीच गती कायम राहिली तर पहिल्याच आठवड्यात ‘दृश्यम 2’ हा 100 कोटींचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या आठवड्यात शुक्रवारी वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांचा ‘भेडियाँ’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ‘दृश्यम 2’च्या कमाईवर किती परिणाम होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘दृश्यम 2’सोबत सध्या अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई’ हा चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये आहे. मात्र त्याची कमाई फारशी होताना दिसत नाही.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम 2’च्या कमाईत 40 तर तिसऱ्या दिवशी 25 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये अजय देवगणसोबतच तब्बू, इशिता दत्ता, अक्षय खन्ना, श्रिया सरन यांच्या भूमिका आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.