Drishyam 2: सर्वकाही तयार असताना शेवटच्या दिवशी दिग्दर्शकाने रद्द केलं होतं शूटिंग; असं नेमकं काय घडलं?

क्लायमॅक्स सीनसाठी सेटसह कलाकारही होते तयार; असं नेमकं काय घडलं की दिग्दर्शकाने सर्वांनाच पाठवलं घरी?

Drishyam 2: सर्वकाही तयार असताना शेवटच्या दिवशी दिग्दर्शकाने रद्द केलं होतं शूटिंग; असं नेमकं काय घडलं?
Drishyam 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 8:30 AM

मुंबई: जवळपास सात वर्षांनंतर ‘दृश्यम’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल ‘दृश्यम 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. हे दोन्ही चित्रपट मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. मल्याळम भाषेतील ‘दृश्यम 2’ खूप आधीच प्रदर्शित झाला होता. तरीसुद्धा अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या हिंदी रिमेकने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळतोय. ओपनिंग, पहिला वीकेंड आणि सोमवारी अशा सर्व बॉक्स ऑफिसच्या परीक्षांमध्ये हा चित्रपट पास झाला. या चित्रपटाच्या पडद्यामागील गोष्टी जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतत दिग्दर्शक अभिषेक पाठकने क्लायमॅक्सशी निगडीत एक किस्सा सांगितला.

‘दृश्यम 2’च्या शेवटच्या दिवसाचं शूटिंग कधीच विसरणार नसल्याचं अभिषेक यांनी सांगितलं. या सीनमध्ये विजय साळगावकर हा त्याच्या कुटुंबीयांकडे परत जातो. हा सीन शूट झाला होता, मात्र अभिषेक त्याच्यावर समाधानी नव्हता. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं.

हे सुद्धा वाचा

क्लायमॅक्सच्या सीनसाठी सेट तयार असताना, सर्व कलाकार शूटिंगसाठी सज्ज असताना अभिषेक पाठवने सर्वांना घरी पाठवलं होतं. शूटिंग रद्द करण्यात आली होती. जेव्हा अजयने अभिषेकला त्यामागचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी अजयकडे थोडा वेळ मागितला.

दृश्यम 2 चा शेवट हा थोडा भावनिक असावा, असं अभिषेक पाठक यांचं मत होतं. यासाठीच त्यांनी थोडा वेळ मागून घेतला. या चित्रपटाला थिएटरमध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय. हा प्रतिसाद पाहता आता निर्मात्यांनी दृश्यम 3 या तिसऱ्या भागाचीही घोषणा केली आहे.

दृश्यम 2 मध्ये अजय देवगणसोबत श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू, अक्षय खन्ना, सौरभ शुक्ला, रजत कपूर यांच्याही भूमिका आहेत. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने 85 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होणार असल्याचं दिसतंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.