‘दृश्यम 2’मध्ये CID चा तडका? एसीपी प्रद्युमनचं विजय साळगावकरशी काय आहे कनेक्शन?

Drishyam 2: विजय साळगावकरच्या कहाणीत CID चा ट्विस्ट; एंटरटेन्मेंटचा डबल डोस

'दृश्यम 2'मध्ये CID चा तडका? एसीपी प्रद्युमनचं विजय साळगावकरशी काय आहे कनेक्शन?
Drishyam 2: विजय साळगावकरच्या कहाणीत CID चा ट्विस्टImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 2:35 PM

मुंबई- ‘दृश्यम 2’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत परततोय. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ हा येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’चा हा सीक्वेल आहे. आता या चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दृश्यम 2 मध्ये प्रेक्षकांना CID चा तडका पहायला मिळणार आहे.

तब्बल 21 वर्षे छोट्या पडद्यावर राज्य करणारी CID ची टीम आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसीपी पद्युमनची टीम चित्रपटात स्पेशल इन्वेस्टिगेशनचा भाग बनणार आहे. आयजी मीराला CID ची टीम साथ मिळणार आहे. त्यामुळे दृश्यम आणि सीआयडीच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच असेल.

शिवाजी साटम यांचा इन्स्पेक्टर अभिजीत आणि इन्स्पेक्टर दया यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये सीआयडी या मालिकेचे क्रिएटर बीपी सिंहसुद्धा दिसले होते. हा फोटो पाहिल्यानंतर सीआयडी मालिका पुन्हा येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र चित्रपटात ही टीम दिसणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पहिल्या भागाचं यश पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.

दृश्यममध्ये अजयसोबत श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू यांच्याही भूमिका होत्या. विजय आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे आयजी मीरा देशमुखच्या (तब्बू) मुलाची हत्या लपवण्याचा प्रयत्न करत असतात. आता सीक्वेलमध्ये हे सत्य सर्वांसमोर येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.