Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?

कसा आहे दृश्यम 2.. वाचा सविस्तर. (Drishyam 2 Movie Review: Read how is Drishyam 2?)

Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 4:01 PM

मुंबई :  2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला दृश्यम (Drishyam) हा चित्रपट प्रचंड गाजला. दक्षिणेतल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. त्यानंतर निशिकांत कामत  (Nishikant Kamat)यांनी हाच चित्रपट 2015 मध्ये हिंदी प्रेक्षकांसाठी पुन्हा नव्यानं आणला. बहुतांश लोकांनी हा हिंदी दृश्यम पाहिलेला आहे. मात्र मोहनलालचा ओरिजिनल मल्याळम दृश्यम आपल्याकडे तरी फारसा कुणी पाहिलेला नाही. तो चित्रपट तुम्हाला संधी मिळाली तर नक्की बघा.(Read a Review of Drishyam 2 Movie )

‘दृश्यम 2’

आता येऊयात दृश्यम 2 या चित्रपटाकडे, पहिला दृश्यम जिथे संपतो अगदी तिथूनच दृश्यम 2 ची कथा पुढे सरकते. जॉर्जकुटी आणि त्याच्या कुटुंबाभोवती ही कथा फिरते पूर्ण वेळ फिरते. पूर्वाश्रमीचा केबल टीव्ही दुकानाचा मालक जॉर्जकुटी आता एका सिनेमा थियेटरचा मालक बनलायं. इतकच नाही तर तो लवकरच एक सिनेमा देखील प्रोडयुस करणार आहे. मोहनलालने रंगवलेला हा जॉर्जकुटी पाहताना लगेचच आपल्याला लक्षात येत की, या माणसाची साऊथमध्ये इतकी क्रेझ का आहे…

सगळ प्रचंड व्यवस्थित सुरू असतं आणि तितक्यातच पहिल्या भागात अनावधानानं घडलेल्या एका खूनाचा किस्सा सात वर्षांनंतर पुन्हा चर्चेत येतो. बंद पडलेली सारी चक्र पुन्हा आरोपीचा शोध घेऊ लागतात. पोलिस विभाग, माध्यमं आणि सरकार अश्या सार्‍या यंत्रणा पुन्हा तडकाफडकी जाग्या होतात.

भक्कम पुराव्यांच्या आधारावर या वेळचा तपास इतका स्ट्राँग असतो की जवळजवळ सार्‍या दुनियेची संशयाची सुई ही जॉर्जकुटीवर जाते. आणि आपल्याला वाटू सुद्धा लागतं की, जॉर्जकुटी आणि त्याचं कुटुंब आता गजाआड जाणारं. मात्र इतकं सगळं होऊन सिनेमा पुन्हा फिरतो आणि आपल्या आकलनशक्ती पलीकडचा क्लायमॅक्स पुन्हा एकदा घडतो. आता तो का आणि कसा हे कळण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला पहावा लागेल.

जीथू जाॅसेफ हया दिग्दर्शकानं पहिल्या भागाप्रमाणे हया भागातही अक्षरशः जादू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एक पुरूष आपल्या कुटूंबाच रक्षण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे हा चित्रपट पाहून अगदी पद्धतशीर कळतं.

स्वप्न आणि भावनांच्या आयुष्यात, जगण्याच्या वास्तवतेशी कसा संघर्ष करावा हे शिकवणारा सिनेमा म्हणजेच दृश्यम 2. तुम्हाला शक्य झाल्यास नक्की बघा.

संबंधित बातम्या 

Sooryavanshi : रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटासाठी रिलीजचा मुहूर्त मिळेना!

Marathi Movie : शिवजयंतीच्या मुहूर्तावर उलगडलं ‘त्या’ व्यक्तिरेखेचं गुढ,‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात गश्मिर महाजनी झळकणार मुख्य भूमिकेत

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.