‘आज विजय साळगावकर खूप खुश असेल’; इशिता दत्ताच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. इस्कॉन मंदिरात या दोघांनी लग्न केलं. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

'आज विजय साळगावकर खूप खुश असेल'; इशिता दत्ताच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Ishita Dutta and Ajay DevgnImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 2:50 PM

मुंबई : ‘दृश्यम’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या दोन्ही भागात अभिनेत्री इशिता दत्ताने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या या भूमिकेच प्रेक्षक-समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं. विजय साळगावकर (अजय देवगण) आणि त्याच्या चित्रपटातील काही सीन्सवर, डायलॉग्सवर आजही विविध मीम्स व्हायरल होतात. आता नुकताच इशिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आज विजय साळगावकर खूप खुश असेल’, असंही काहींनी म्हटलंय.

इशिताचा हा व्हिडिओ तिच्या डोहाळ जेवणाचा आहे. इशिता लवकरच आई होणार असून नुकताच तिचा बेबी शॉवर पार पडला. यावेळी कार्यक्रमानंतर पती वत्सल शेठसोबत ती पापाराझींसमोर फोटो क्लिक करण्यासाठी आली. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आणि वत्सल शेठने पांढऱ्या रंगाचा कुर्ता – पायजमा परिधान केला होता. ही जोडी खूपच सुंदर दिसत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पापाराझींसमोर फोटो क्लिक करताना वत्सलने इशिताच्या बेबी बंपलाही किस केलं.

हे सुद्धा वाचा

इशिता आणि वत्सलची जोडी, त्यांचं प्रेम पाहून कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी ‘दृश्यम’ चित्रपटाशी संबंधित भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘या जगात आज विजय साळगावकर सर्वांत खुश असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘अखेर 2 ऑक्टोबर रोजी काय झालं होतं, ते आम्हाला समजलंय’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘सर्वोत्कृष्ट जोडी’ अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं.

पहा व्हिडीओ

2023 हे वर्ष इशिता आणि तिचा पती वत्सलसाठी खूपच खास ठरत आहे. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी नवीन घर खरेदी केलं. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हे दोघं नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. तर दुसरीकडे लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशिता आई होणार आहे. इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. इस्कॉन मंदिरात या दोघांनी लग्न केलं. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

2021 मध्ये इशिता गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी इशिताने पुढे येऊन या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. गेल्या वर्षी तिने ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. अजय देवगण आणि इशिताशिवाय या चित्रपटात श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्याही भूमिका होत्या.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.