Drugs Connection | ड्रग्ज प्रकरणी अटक झालेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानचा जामीन अर्ज मंजूर!
ड्रग्ज खरेदी करताना आढळल्याने ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या.

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे (Preetika Chauhan gets Bail). 15 हजार रुपयांच्या रोख रकमेवर तिची सुटका करण्यात आली आहे. प्रीतिका चौहानसह ड्रग तस्कर फैजल यालासुद्धा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर रोजी प्रीतिका आणि फैजलला मुंबईच्या वर्सोवा भागातून अटक करण्यात आली होती. (Drug Connection Actress Preetika Chauhan gets Bail)
ड्रग्ज खरेदी करताना आढळल्याने ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने बेड्या ठोकल्या होत्या.
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अनेक मोठी नावे समोर आली आहेत. यापैकी बऱ्याच जणांना समन्स पाठवून एनसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. (Drug Connection Actress Preetika Chauhan gets Bail)
ड्रग्ज खरेदी करताना अटक
प्रीतिका ड्रग्ज तस्कराकडून ड्रग्ज विकत घेत असताना तिला एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. यानंतर प्रीतिका चौहानच्या घरी 24 ऑक्टोबर रोजी एनसीबीने छापेमारी केली होती. ज्यामध्ये एनसीबीच्या हाती भक्कम पुरावे लागल्याने तिला अटक करण्यात आली होती. अभिनेत्री प्रीतिका चौहान ही ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत मुख्य भूमिका सकारात आहे. दरम्यान तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यापूर्वी तिची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या ड्रग्स कनेक्शनमध्ये आणखी काही सेलिब्रेटी अडकण्याची शक्यता आहे.(Drug Connection Actress Preetika Chauhan gets Bail)
वर्सोवा भागात एनसीबीने रचला सापळा!
याच प्रकरणात एनसीबीला आणखी एका ड्रग तस्कराबाबत कुणकुण लागल्याने त्यांनी साध्या वेशात मुंबईतल्या वर्सोवा भागात सापळा रचला होता. एनसीबीच्या या सापळ्यात पाच जण अडकले होते. यापैकी दोघांजवळ 99 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. तर, यावेळी टीव्ही अभिनेत्री प्रीतिकाला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या अभिनेत्रीला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. एनसीबीची ही धडक कारवाई अद्याप सुरूच आहे.
A team of Mumbai Zonal Unit apprehended two persons at Machhimar, Versova, and succeeded in a seizure of 99 grams of Ganja from their possession, yesterday. The two persons – one Faisal & TV actor Preetika Chauhan – were arrested & produced before court: Narcotics Control Bureau
— ANI (@ANI) October 25, 2020
‘सावधान इंडिया’च्या दिग्दर्शकाची चौकशी
अॅगिसिलोस याच्या चौकशीत ‘सावधान इंडिया’चा सोहेल कोहलीचे नाव समोर आले. त्यामुळे एनसीबीने सोहेल याची देखील चौकशी केली आहे. सोहेल याच्यावर ड्रग्जचे वितरण करणे आणि सेवन करणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने एनसीबीकडून चौकशी त्याची करण्यात आली आहे. तब्बल सहा तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे.
(Drug Connection Actress Preetika Chauhan gets Bail)