NCB कार्यालयात हजेरी लावून रिया चक्रवर्ती परतली, कोर्टाच्या ‘त्या’ आदेशाचं रिया-शौविककडून पालन
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs case) समोर आले होते.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण (Drugs case) समोर आले होते. या ड्रग्ज कनेक्शनमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty)ला या प्रकरणी अटकही झाली होती. ते दोघेही आता जामीनावर बाहेर आहेत. मात्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज एनसीबी कार्यालयात आली होती. रियासोबत तिच्या भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडीलहीसोबत होते. रिया आणि शौविक हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात आले होते. (Drugs case Actress Rhea Chakraborty at the NCB office today)
कोर्टाकडून जामीन देताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आज रिया आणि शौविक सकाळीच एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते. कोर्टाने शौविक चक्रवर्ती याचा जामीन अर्ज 2 डिसेंबरला मंजूर केला होता. तर रिया चक्रवर्तीला तब्बल 28 दिवसानंतर जामीन मंजूर मिळाला आला होता. मात्र, जामीन अर्ज मंजूर करताना कोर्टाने महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती.
तब्बल 3 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला होता. रिया ड्रग्ज सिंडिकेटची सक्रीय सदस्य असल्याचे पुरावे NCB देऊ न शकल्याने, रियाला जामीन देण्यात आला होता. दुसऱ्या व्यक्तीला अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम 27-अ अन्वये अमली पदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना नमूद केले होते.
संबंधित बातम्या :
रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
(Drugs case Actress Rhea Chakraborty at the NCB office today)