Aryan Khan drug case | शाहरुखला तिसऱ्यांदा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी !
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबई न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही सत्र न्यायालकडे दाद मागू असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.
#Breaking : Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha holding that the applications are not maintainable. #AryanKhan
— Live Law (@LiveLawIndia) October 8, 2021
आर्यन खानसह दोघांचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.
तातडीने सत्र न्यायालयात जाणार
आर्यन खान आणि इतर दोघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एनसीबीला ड्रग्ज प्रकरणात अधिक चौकशी करता येणार आहे. मात्र, या निकालाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीनं सत्र न्यायालयात जाणार असल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.
दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी
आर्यन खानसह त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर साथिदारंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खानची बाजू अॅड. सतिश मानेशिंदे यांनी मांडली तर एनसीबीतर्फे एएसजी सिंग यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद तब्बल अडीच तास चालला. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
कोर्टात नेमकं काय घडलं ?
जेव्हा बोलवाल तेव्हा आर्यन चौकशीला येईल
युक्तिवादादरम्यान, मानेशिंदे यांनी आर्यन खानला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी केली. त्यासाठी त्यांनी कोर्टाला एकूण 22 निकालांचा हवाला दिला. तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, असेदेखील ते म्हणाले. आरोपींना जामीन देण्याबाबत जे अधिकार हायकोर्ट आणि सेशन कोर्टला आहेत. तेच अधिकार महानगरीय कोर्टालाही आहेत. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅमदेखील ड्रग्ज सापडलेले नाही. म्हणून जामीन मिळावा. आर्यन खानकडे चॅटशी निगडित मटेरियल सापडलं आहे. तो जामिनास पात्र आहे. आरोपी जामिनावर असूनसुद्धा चौकशीला सहयोग करू सकतो. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा चौकशीसाठी यायला तयार आहे, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.
आर्यन 23 वर्षाचा पळून जाणार नाही, जामीन द्यावा
यावेळी जामिन मिळावा म्हणून मानेशिंदे यांनी आर्यनच्या वयाचा दाखला दिला. आर्यन फक्त 23 वर्षांचा आहे. त्याचा मोबाईल सध्या जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे. त्याला पार्टीसाठी फक्त आमंत्रण देण्यात आलं होतं. त्याचा मोबाईल सध्या फॉरेन्सिककडे आहे. त्याचा एक परिवार आहे. त्याचे आई-वडील येथेच राहतात. त्यामुळे आर्यन देशाबाहेर जाण्याचा किंवा फरार होण्याचा प्रश्नच नाही, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला.
सिंग यांनी दिला रिया चक्रवर्ती खटल्याचा दाखला
तर आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी एएसजी सिंग यांनी केली. या प्रकरणात अचित कुमार नंतर आम्ही एका नायजेरियनला अटक केली आहे. सर्वजण आरोपींना जामीन मिळावा असे सांगत आहेत. पण हा जामीन दिला जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. तसेच न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळावा यासाठी त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जाचा दाखला दिला. NDPS Act नुसार दाखल केलेले सर्व गुन्हे हे अजामीनपात्र आहेत, असा दावा सिंग यांनी केला.
एएसजी आणि मानेशिंदे यांच्यात खडाजंगी
एएसजी यांनी शोईक चक्रवर्ती याच्या हायकोर्टाच्या जामीन आदेशाचा हवाला दिला.
एएसजी – एका गुन्ह्यात 17 जणांचा सहभाग असलेले हे प्रकरण आहे. दुवा, संबंध आणि सहभागाचा मुद्दा बाजूला… तपास प्राथमिक टप्प्यावर आहे.
एएसजी : लोक किती प्रभावशाली आहेत याचा विचार करावा लागेल. छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच हे काही वेगळे प्रकरण नाही. जामिनाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे संरक्षण तपासात अडथळा आणेल.
मानेशिंदे – मी अगदी स्पष्ट केले की मी हक्काचा विषय म्हणून जामीन मागत नाही. मी असे म्हटले नाही की सेक्शन जामीनपात्र आहेत. म्हणून मी सीआरपीसीचे कलम 437 वाचले. परंतु फिर्यादी असे म्हणू शकत नाही की आपण (मॅजिस्ट्रेट कोर्ट) रिमांडसाठी नियमित न्यायालय आहात, जामीनसाठी नाही.
मानेशिंदे : एनडीपीएस कायद्याच्या 36 ए मध्ये जामीन मंजूर करण्याबद्दल नव्हे तर खटल्याबद्दल बोलले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी कलम 437 सीआरपीसी वाटते
इतर बातम्या :
मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब