Ekta Kapoor ला नेटकरी का म्हणत आहेत ‘छोटा भीम’? कारण जाणून व्हाल हैराण
Ekta Kapoor : सोशल मीडियावर एकता कपूर हिला का करावा लागत आहे ट्रोलिंगचा सामना? नेटकरी म्हणाले, 'छोटा भीम'... सोशल मीडियावर सर्वत्र एकता कपूर हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल... नेटटकऱ्यांनी कमेंट करत साधला टीव्ही क्विनवर निशाणा... सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई : 28 ऑक्टोबर 2023 : टीव्ही विश्वाची क्विन एकता कपूर (Ekta Kapoor) कायम तिच्या अनोख्या अंदाजामुळे चर्चेत असते. एकता कपूर हिची एकही अशी मालिका नाही जी, प्रेक्षकांना आवडलेली नाही. आजही चाहत्यांमध्ये एकता कपूर हिच्या जुन्या, नव्या मालिकांची चर्चा रंगलेली असते. एवढंच नाही तर, मालिकेच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर एकता हिने त्याच मालिकेचे इतरही भाग चाहत्यांसाठी निर्मित केले. एकता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर एकता हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ शुक्रवारी पार पडलेल्या मामी फिल्म फेस्टिवल 2023 सोहळ्या दरम्यानचा आहे.
फिल्म फेस्टिवलमध्ये एकता काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचली होची. एकताच्या ऑफ शोल्डर काळ्या रंगाच्या ड्रेसवर अनेकांच्या नजरा येवून थांबल्या. वयाच्या ४८ व्या वर्षी एकता सुंदर दिसत आहे. पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर एकता हिला ट्रोल करण्यात येत आहे.
एकता कपूर हिचा रेड कार्पेटवरील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एकता पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत एकता हिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, ‘एकता कपूर हिचं ड्रेसिंग सेन्स फार वाईट आहे….’
View this post on Instagram
अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘छोटा भीम…’ सांगायचं झालं तर, एकता कपूरला तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही ती अनेकवेळा तिच्या ड्रेसमुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली आहे. सोशल मीडियावर एकता कपूर हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात.
एकता कपूर हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘थँकयू फॉर कमिंग’ सिनेमाची निर्मिती केली होती. रिया कपूर हिने देखील सिनेमाच्या निर्मितीची जबाबादारी घेतली होती. सिनेमात भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, कुशा कपिला, शिबानी बेदी, करण कुंद्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी मुख्य भूमिका साकारली होती. पण सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही.
एकता कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, एकता हिने अद्याप लग्न केलेलं नाही. एकताने सरोगेसीच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. एवढंच नाही तर, एकता कपूर हिचा भाऊ तुषार कपूर याने देखील सरोगेसीच्या माध्यमातून मुलाला जन्म दिला आहे.