कुठे आहे एल्विश यादव? FIR दाखल झाल्यानंतर गायब? शेवटचं लोकेशन कळलं आणि…
Elvish Yadav : रेव्ह पार्टी, पार्टीत परदेशी मुलींचा पुरवठा आणि बरंच काही... वादाच्या भोवऱ्यात सापडलेला एल्विश यादव गायब, शेवटच्या लोकेशनबद्दल मोठी माहिती समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि एल्विश यादव याची चर्चा
मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष, ड्रग्ज आणि परदेशी मुलींच्या पुरवठ्या प्रकरणी एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एल्विश यादव याची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पण एल्विश सध्या गायब आहे. मुंबईतील एल्विशचे जुने वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एवढंच नाही तर, एफआयआर दाखल झाल्यापासून एल्विशचा शोध लागला नाही.
एल्विश सध्या कुठे आहे याबद्दल काही कळू शकलेलं नाही. पण एल्विश याच्या शेवटच्या लोकेशनची माहिती हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश मुंबई येथील अंधेरीतील एका हॉटेलमध्ये होता. अंधेरी येथील हॉटेल एम्प्रेसामध्ये एल्विशचं शेवटचं लोकेशन असल्याचं समोर आलं आहे.
टेम्पटेशन आयलंडच्या शूटिंगनंतर एल्विश अलिबागहून मुंबईत आला आणि या हॉटेलमध्ये राहिला होता. आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळताच एल्विश याने हॉटेलमधून दुपारी निघाला असल्याची माहिती मिळत आहे.. सध्या एल्विश कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अंधेरीतील हॉटेलमधून निघाल्यानंतर एल्विश कुठे पोहोचला याबद्दल काहीही माहिती अद्याप मिळाली नाही… असं देखील सांगण्यात येत आहे. मुंबईतून निघाल्यानंतर एल्विश दिल्ली याठिकाणी जाईल अशी चर्चा होती. पण अद्याप देखील त्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे एल्विश अद्याप मुंबई याठिकाणी आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधीत प्रकरणाचा एल्विशच्या कामावर होईल परिणाम
यूट्यूबर एल्विश यादव अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस सीजन 17’ मध्ये देखील दिसला होता. एल्विशने या शोच्या एपिसोडसाठी आधीच शूटिंग केलं होतं अशी माहिती देखील समोर येत आहे. यूट्यूबर सलमानच्या शोमध्ये त्याच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी आला होता.
प्रसिद्धी झोतात आल्यामुळे एल्विशकडे अनेक रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओंच्या ऑफर्सही आहेत. पण एल्विश बेपत्ता असल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो… अशी दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.