अखेर एल्विश यादव याने केला रेव्ह पार्टीबद्दल मोठा खुलासा, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

एल्विश यादव याने बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये मोठा धमाका केला. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता आहे. विशेष म्हणजे एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तो नेहमीच चर्चेत देखील असतो.

अखेर एल्विश यादव याने केला रेव्ह पार्टीबद्दल मोठा खुलासा, 'तो' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 3:24 PM

मुंबई : एल्विश यादव याचे नाव रेव्ह पार्टीमध्ये आल्यापासून चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर याप्रकरणात एल्विश यादव याच्यासोबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच काही गंभीर आरोप हे करण्यात आले. नुकताच एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी सीजन २ जिंकला आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. एल्विश यादव याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या पार्टीसाठी थेट विदेशातून मुली बोलावण्यात आल्या. फक्त इतकेच नाही तर थेट येथे 5 कोब्रा आणि विविध प्रजातीच्या सापांचे विष देखील मिळाले आहे. इतर पाच जणांना या प्रकरणात पोलिसांकडून अटकही करण्यात आली. मात्र, अजून एल्विश यादव याला अटक करण्यात नाही आली.

आता नुकताच याबद्दल मोठा खुलासा करताना एल्विश यादव हा दिसला आहे. एल्विश यादव याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, मी आज सकाळी झोपीमधून उठल्यावर या सर्व धक्कादायक गोष्टी बघितल्या आहेत. मला अटक केली वगैरे. इतकेच नाही तर एल्विश यादव हा ड्रग्जसह पकडला गेला असल्याचे देखील सांगितले जात आहे.

मी तुम्हाला सांगतो की, अशा गोष्टींमध्ये एक टक्का देखील सत्य नाहीये. माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत. यामध्ये काढीभरही सत्य नक्कीच नाहीये. मुळात म्हणजे मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आणि पोलिस प्रशासनाला विनंती करतो की, या प्रकरणात माझी एक टक्का देखील चूक असेल तर मी सर्व जबाबदारी घेण्यास तयार आहे.

या व्हिडीओमध्ये एल्विश यादव याने पोलिसांना सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केलंय. एल्विश यादव याच्या व्हिडीओवरून हे देखील स्पष्ट होतंय की, त्याला अजून पोलिसांकडून अटक करण्यात आली नाहीये. मात्र, एल्विश यादव याच्यावर सतत या प्रकरणात गंभीर आरोप हे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय मोठे खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.