‘सीरियल किसर पुन्हा परतला…’, इमरान हाश्मी – मौनी रॉय यांचा किसिंग सीन, व्हिडीओ पाहून म्हणाल…

'सीरियल किसर' म्हणून इमरान हाश्मीची इंडस्ट्रीत ओळख... मौनी रॉय हिच्यासोबत अभिनेत्याचा किसिंग सीन, व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मी - मौनी रॉय यांच्या किसिंग सीनची चर्चा...

'सीरियल किसर पुन्हा परतला...', इमरान हाश्मी - मौनी रॉय यांचा किसिंग सीन, व्हिडीओ पाहून म्हणाल...
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 10:36 AM

मुंबई | 5 मार्च 2024 : अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री मौनी रॉय लवकरच ‘शोटाईम’ मध्ये दिसणार आहेत. ‘शोटाईम’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना पुन्हा इमरान याचा ‘सिरियल किसर’ अवतार पाहायला मिळणार आहे. अभिनेत्याच्या ‘सिरियल किसर’ अवतारची एक झलक समोर आली आहे. सीरिजमध्ये मौनी रॉय हिला अभिनेता किस करताना दिसत आहे. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मी आणि मौनी रॉय यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे.

‘शोटाईम’ सीरिजया ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. सीरिज बॉलिवूडच्या काळ्या रहस्यांवर आधारलेली आहे. पडद्या मागे काय होत असते… यांसारख्या अनेक गोष्टी ‘शोटाईम’ सीरीजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

सीरिजमध्ये मौनी रॉय आणि इमरान यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे. सीरिजमध्ये मौनी हिने यास्मीन अली ही भूमिका साकारली आहे. चाहते देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सीरिजमध्ये इमरान, मौनी यांच्यासोबत अभिनेत्री महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल, श्रिया सरन, विशाल वशिष्ठ, नीरज माधव, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सीरिज कधी प्रदर्शित होणार याच प्रतीक्षेत चाहते आहेत.

कुठे आणि कधी पाहू शकतात ‘शोटाईम’ वेब सीरिज?

‘शोटाईम’ वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सीरिज 8 मार्च 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक मिहिर देसाई आणि अर्चित कुमार यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. चाहते देखील आता सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत.

सांगायचं झालं तर, इमरान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता. त्यानंतर इमरान अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ मध्ये देखील दिसला होता. आता अभिनेता ‘शोटाईम’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजमध्ये मौनी मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.