विवाहित महिलेच्या प्रेमात इमरान हाश्मी, पतीने दोघांना पकडलं ‘रंगेहाथ’, त्यानंतर मात्र…
Emraan Hashmi | बॉलिवूडचा 'सीरियल किसर' विवाहित महिलेच्या प्रेमात... तिच्या पतीने दोघांना 'रंगेहाथ' पकडल्यानंतर... खुद्द अभिनेत्याने केलाय मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त इमरान हाश्मी याच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेता इमरान हाश्मी याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्याने करियरच्या सुरुवात अनेक सिनेमांमध्ये किसिंग सीन दिल्यामुळे अभिनेत्याला बॉलिवूडच्या ‘सीरियल किसर’चा टॅग मिळाला. आज देखील इमरान याची ओळख ‘सीरियल किसर’ म्हणून आहे. अभिनेत्याचे किसिंग सीन पाहून पत्नीला प्रचंड राग यायचा… इमरान याच्या पत्नीबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडबद्दल फार कमी लोकांना माहिती. लग्न करण्यापूर्वी अभिनेत्याच्या आयुष्यात एक महिला होती. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने त्याच्या लग्नापूर्वीच्या गर्लफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे.
इमरान हश्मी याने एका विवाहित महिलेला डेट केलं आहे. पण जेव्हा अभिनेता विवाहित महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा आपल्यासोबत असलेली महिला विवाहित आहे हे सत्य अभिनेत्याला माहिती नव्हतं. एका मुलाखतीत अभिनेत्याला कधी विवाहित महिलेला डेट केलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘माझं एका विवाहित महिलेसोबत अफेअर होतं. पण मला माहिती नव्हतं की ती विवाहीत आहे.’ एवढंच नाहीतर, अभिनेत्याने नात्याचा अंत कसा झाला याबद्दल देखील अभिनेत्याने सांगितलं. त्या महिलेच्या पतीला कळलं होतं की, त्याची पत्नी इमरान हश्मी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एक दिवस महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. सांगताना अभिनेता म्हणाला, ‘परिस्थितीतून स्वतःचा बचाव करण्याचा दुसरा मार्ग नव्हता. शेवट प्रचंड वाईट होता…’
इमरान हश्मी याची पत्नी
इमरान हाश्मीने 2006 मध्ये परवीन साहनीसोबत लग्न केलं आणि त्यापूर्वी दोघेही साडेसहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. अभिनेत्याचं कुटुंब लाईमलाईटमध्ये नसतं. पण कोणत्याही कार्यक्रमासाठी अभिनेत्याला कुटुंबासोबत स्पॉट केलं आहे. आज इमरान हश्मी याचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, इमरान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता. त्यानंतर इमरान अभिनेता सलमान खान स्टारर ‘टायगर 3’ मध्ये देखील दिसला होता. आता अभिनेता ‘शोटाईम’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सीरिजमध्ये मौनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सीरिजमध्ये दोघांवर किसिंग सीन देखील चित्रित करण्यात आले आहेत.