ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ म्हणणं इमरान हाश्मीला पडलं महागात; म्हणाला..

अभिनेता इमरान हाश्मीने एका चॅट शोमध्ये ऐश्वर्या रायला प्लास्टिक असं म्हटलं होतं. त्याच्या या वादग्रस्त टिप्पणीची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. आता त्याची हीच कमेंट पुन्हा एकदा चर्चेत आली असून खुद्द इमरानने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऐश्वर्या रायला 'प्लास्टिक' म्हणणं इमरान हाश्मीला पडलं महागात; म्हणाला..
Emraan Hashmi and Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 3:52 PM

मुंबई : 23 फेब्रुवारी 2024 | अभिनेता इमरान हाश्मी लवकरच ‘शो टाइम’ या वेब सीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या या वेब सीरिजचं तो जोरदार प्रमोशन करतोय. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला की सीरिजमधील त्याची भूमिका ही करण जोहरच्या 2014 मध्ये प्रसारित झालेल्या ‘कॉफी विथ करण 4’सारखीच बेधडक असणार आहे का? करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या चौथ्या सिझनमधील एका एपिसोडमध्ये इमरानने हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये त्याने अभिनेत्री ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ असं म्हटलं होतं. त्या वादग्रस्त कमेंटवर आता इमरानने प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

इमरान म्हणाला, “मी शो टाइम या वेब सीरिजमध्ये एक काल्पनिक भूमिका साकारतोय. जो गोष्टी जशा आहेत तशाच दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॉफी विथ करणबद्दल बोलायचं झाल्यास, तेव्हा मी जे म्हणालो त्या गोष्टीचा परिणाम मला बऱ्याच काळापर्यंत भोगावा लागला होता. रॅपिड फायर राऊंडदरम्यान करणने तो शॉट कट केला आणि त्याने सेटवर चारही बाजूंनी नजर फिरवली. प्रत्येकजण त्यावेळी स्तब्ध होता. तुम्ही हे (इमरानचं उत्तर) असंच ठेवू शकता का? असा प्रश्न त्याने त्यांना विचारला. त्यावेळी कॅमेरामागे असलेल्या काही लोकांनी त्यांना ‘हो’ असं म्हटलं होतं.”

ऐश्वर्याला म्हणाला ‘प्लास्टिक’

2014 मध्ये इमरान हाश्मीने ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने ऐश्वर्या रायबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, ज्याची खूप चर्चा झाली होती. याच वक्तव्याचा परिणाम भोगावा लागल्याचं इमरानने म्हटलंय. कॉफी विथ करणमध्ये इमरानने ऐश्वर्याला प्लास्टिक असं म्हटलं होतं. रॅपिड फायर राऊंडदरम्यान जेव्हा करणने इमरानला विचारलं की, प्लास्टिक शब्द म्हणताच तुझ्या डोक्यात पहिलं नाव काय येतं? तेव्हा इमरानने ऐश्वर्याचं नाव घेतलं होतं. नंतर इमरानने याबद्दल स्पष्टीकरणही दिलं होतं.

हे सुद्धा वाचा

इमरान हाश्मीचं स्पष्टीकरण

“माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मी ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. शोचा फॉरमॅटच तसा होता. मी काहीच बोललो नसतो तर हॅम्परसुद्धा जिंकू शकलो नसतो. मला ऐश्वर्या खूप आवडते. मला नेहमीच तिचं काम आवडलंय. मला माहित होतं की लोक यावरून खूप मोठा वाद करतील. पण आपण काय करू शकतो? लोक नेहमीच कोणत्याही गोष्टीवरून तमाशा करतात”, असं इमरानने त्यावेळी स्पष्टीकरण दिलं होतं.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.