Binge Watch : ऑगस्ट महिन्यात मिळणार मनोरंजनाची मेजवानी, ‘डायल 100’ ते ‘द सुसाइड स्क्वॉड’ पर्यंत ‘या’ वेब सिरीज करणार धमाका
मनोज बाजपेयीच्या ‘डायल 100’ ते ‘द सुसाइड स्क्वॉड’ सारख्या मालिका आणि चित्रपटांचा समावेश आहे. (Entertainment feast to be held in August, from 'Dial 100' to 'The Suicide Squad')
Follow us
ऑगस्ट महिना सुरू झाला आहे, आता एकाहून एक उत्तम वेब सिरीजचा आनंद घेण्यासाठी स्वतःला तयार करा. या आठवड्यात नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, एचबीओ मॅक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मालिका आणि चित्रपट रिलीज होत आहेत, ज्यात मनोज बाजपेयीच्या ‘डायल 100’ ते ‘द सुसाईड स्क्वाड’ सारख्या मालिका आणि चित्रपटांचा समावेश आहे. चला तर मग या आठवड्यात डिजिटल स्पेसवर टक्कर देणारे चित्रपट, शो आणि मालिका पाहूयात.
मनोज बाजपेयी, नीना गुप्ता आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेला डायल 100 हा चित्रपट 6 ऑगस्ट रोजी झी5 वर रिलीज होत आहे. हा एक हिंदी थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे, ज्यात एक फोन कॉल प्रत्येकाच्या आयुष्यात अशांतता निर्माण करतो. याचे दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्वा यांनी केले आहे.
5 ऑगस्ट रोजी HBO Max वर सुसाइड स्क्वॉड रिलीज होईल. मार्गोट रॉबी, इद्रिस एल्बा, जॉन सीना, सिल्वेस्टर स्टॅलोन स्टारर हा चित्रपट जेम्स गुन्न दिग्दर्शित आहे.
तामिळ वेब मालिका नवरसची निर्मिती मणिरत्नम यांनी केली आहे. सुरिया, विजय सेतुपती, मणिकुट्टन, अशोक सेल्वन सारख्या कलाकारांचा समावेश असलेली ही मालिका 6 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य – मानवाच्या 9 मूलभूत अभिव्यक्ती लक्षात ठेवून भारतीय तमिळ संकलननं वेब सिरीज तयार केली गेली आहे. यात 9 वेगवेगळ्या कथा आहेत.
प्रे अवे रायन मर्फी निर्मित आहे. हा माहितीपट चित्रपट 3 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.