Rakhi Sawant | माझ्यावर बायोपिक बनवा ना… राखी सावंत हिची प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे मागणी !
अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक वाद सुरू असून त्यासंदर्भात तिने अनेक खुलासेही केले आहेत. याचदरम्यान राखीने आता नवी मागणी केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाला राखी म्हणाली....

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि चर्चा हे एक अतूट समीकरण आहे. दरवेळेस, कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत कसं रहायचं, लाइमलाइट (limelight) स्वत:वर कसा ठेवायचा हे गणित राखीला नेमकं उमगलं आहे. मग त्यासाठी अतरंगी कपडे घालणं असो किंवा एखादं स्फोटक विधान करणं असो अगदी काही नाही तर रडत-रडत कॅमेऱ्याचा रोख स्वत:कडे वळवून घेण्याची क्लृप्ती तिला सुचतेच. आणि मग सगळेच जण तिच्याबद्दल चर्चा करत बसतात.
अशी ही राखी सध्या तिच्या पर्सनल आयु्ष्यामुळे बरीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद वाढतच चालला असून कटुताही वाढत आहे. गुपचूप-गुपचून लग्न करणाऱ्या राखीने नंतर आदिल वर अनेक गंभीर आरोप केले. नंतर आदिलही मागे हटला नाही, त्याने राखीचं खरं रूप काय आहे याबद्दल मीडियासमोर बेधडक मुलाखती द्यायला सुरूवात केली. राखी आणि आदिल वेगळे झाले असले तरी अद्यापही एकमेकांवर दोषारोप करणं त्यांनी सोडलेलं नाही.
ही आहे राखी सावंतची इच्छा
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रोज नवनवे खुलासे करणाऱ्या राखी सावंतने नुकतीच एक इच्छा व्यक्त केली आहे. कांतारा चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने तिच्या जीवनावर आधारित एखादा चित्रपट अर्था ‘बायोपिक’ बनवावा, अशी राखीची इच्छा आहे. (तिच्याबद्दल काहीबाही बोलून) आदिल बॉलिवूडच्या लोकांना आणखी धोका देऊन नये, तिच्याबद्दल उलटसुलट पसरवू नये, यासाठी तिच्या आयुष्यावर बायोपिक यावा असं तिचं म्हणणं आहे. 7 फेब्रुवारीला राखीने आरोप केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती.
नुकत्याच झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये राखी सावंतने आदिलच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. त्याने (आदिल) जसा माझा विश्वासघात केला, तसाच तो बॉलिवूडच्या इतर लोकांना धोका देण्याचा कट रचत आहे, असं ती म्हणाली. एवढंच नव्हे तर ‘कांतारा’ चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने आपल्या जीवनावर आधारित बायोपिक बनवावा, अशी इच्छाही तिने व्यक्त केली.
ऋषभ शेट्टीने ‘कांतारा’ चित्रपटात केवळ अभिनयच केला नव्हता तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. मात्र राखी सावंतची ही मागणी ऐकून चाहत्यांना जराही आश्चर्य वाटलं नाही, राखाी काहीही बोलू शकते, असंच अनेकांना वाटतं. त्यामुळेच तिच्या या मागणीने कोणालाच धक्का बसला नाही.