Top 5 News | विकी कौशल-कतरिनाच्या साखरपुड्याची चर्चा ते ‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी..

जर तुम्ही गुरुवार म्हणजेच 19 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | विकी कौशल-कतरिनाच्या साखरपुड्याची चर्चा ते ‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी..
Top 5 News
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 10:29 AM

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही गुरुवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही गुरुवार म्हणजेच 19 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

विकी कौशल-कतरिना कैफ यांचा साखरपुडा झाला? पाहा अभिनेत्रीची टीम काय म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) बुधवारी पूर्ण दिवसभर चर्चेत होते की, या दोन्ही कलाकारांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या चर्चेत आल्या होत्या की, दोघांनीही त्यांचे नाते आता पुढे नेले आहे, पण आता या दोघांनी लग्न केले नसल्याची बातमी समोर आली आहे. दिवसभर सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये त्यांच्या रोमान्सची चर्चा होत होती. काही माध्यमांच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, दोघांचाही एक छोटासा रोका सेरेमनी पार पडला आहे आणि आता ते अधिकृतपणे नात्यात अडकले आहेत. मात्र, ही बातमी केवळ अफवा ठरली आहे.

अनेक अडचणींचा सामना करत अखेर पार पडतोय ओम-स्वीटूचा साखरपुडा

छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे. आता स्वीटूची आई अर्थात नलू मावशी हिचा स्वीटू आणि ओमच्या नात्याला असलेला विरोध पूर्णपणे मावळला आहे. ओमने आपल्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी नलूने त्याला अनेक कष्ट करायला लावले. मात्र, कुठल्या परीक्षेला न घाबरता आपल्या प्रेमावर विश्वास ठेऊन ओम नेहमीच जिंकत राहिला. अर्थात त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नलूचा विरोध आता होकारात बदलला आहे. तिने या दोघांच्या नात्याला अखेर परवानगी दिली आहे. लवकरच या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.

‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun banega crorepati 13) पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या केबीसीचा हा 13 वा सीझन असणार आहे. यावेळी हा शो 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) देखील ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दिसणार आहेत. आतापर्यंत लोकांनी आणि चाहत्यांनी क्रिकेटच्या मैदानावर गांगुली आणि सेहवागची जोडी पाहिली आहे, जी खूप यशस्वीही झाली आहे. पण प्रेक्षक आता त्यांची ही जोडी KBC च्या हॉट सीटवर दिसणार आहे. सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग ‘KBC 13’च्या ‘कर्म वीर’ विशेष भागात दिसणार आहे.

‘पालेकरांसोबत काम करणं अद्भुत अनुभव’ अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भावना

ZEE5 चा आगामी चित्रपट ‘200- हल्ला हो’ (200 Halla Ho) चा ट्रेलर रीलीज झाल्यापासून, चाहते विविध कारणांसाठी चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर एक दशकानंतर परतले आहेत आणि सत्य कथेने प्रेरित अशी ही एक प्रभावी कथा आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, 200 – हलला हो!, 200 दलित महिलांनी खुल्या न्यायालयात गुंड, दरोडेखोर आणि बलात्काऱ्याला मारहाण करून कायदा आणि न्याय कसा मिळवला याची कथा आहे. उपेंद्र लिमये, (Actor Upendra Limaye) या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत, त्यांनी दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणतात, “माझ्या पिढीमध्ये दोन सुपरस्टार असायचे, एक श्री अमिताभ बच्चन आणि दुसरे अमोल पालेकर. सामान्य मध्यमवर्गीय पुणेरी कुटुंबातील असल्याने मी श्री पालेकरांचा चाहता होतो आणि आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला इतक्या मोठ्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अमोल पालेकर यांनी मला अनेक वेळा दिग्दर्शित केलं आहे परंतु ‘200-हल्ला हो’ मध्ये मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली जे माझ्यासाठी एक स्वप्नच आहे. जे माझ्यासाठी खरे ठरले. पालेकर व्यतिरिक्त, अनेक प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. यामध्ये सुषमा देशपांडे, गौतम जोगळेकर, रिंकू राजगुरू सारख्या मराठी चित्रपट जगतातील अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे – एकूणच तो एक अद्भुत अनुभव होता प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे. ”

अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?

शेवंताने वाड्यात आलेल्या नव्या सुनेचा अर्थात अभिरामच्या बायकोच्या शरीराचा ताबा घेतला आहे. तर आता अण्णाना देखील परतण्यासाठी एका ‘झाडा’ची अर्थात शरीराची आवश्यकता आहे. अण्णांनी यासाठी अभिरामच्या शरीराचा ताबा घेण्याचे ठरवले आहे. मात्र, या सगळ्यात आता अभिराम देखील अडकणार का? की माईची पुण्याई अभिरामला यातून वाचून शकेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी माईने दिलेल्या देवाच्या विड्यामुळे अभिराम थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. मात्र, पुढे काय होईल, याची कल्पना कुणालाच नाही.

हेही वाचा :

अंतराळाशी संबंधित हॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहताना तुमचेही डोके चक्रावून जाईल!

सलमान खानची पत्नी बनल्यानंतरही नाही चमकली शीबा साबीरची कारकीर्द, इंडस्ट्रीपासून दूर जगतेय सुखी आयुष्य!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.